Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळणार, कुणबी नोंदीवरही निर्णय; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Eknath Shinde : मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे म्हणून गेले सात दिवस मनोज जरांगे बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली. (Maratha Reservation)

Eknath Shinde
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचा उल्लेख 'असा' केला; शिंदे जरांगेंवर नाराज आहेत का?

मागच्या सरकारने ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण दिले होते त्या प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यात येणार आहे.जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. नवे मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी शिंदे यांनी कमी वेळेत हे काम पूर्ण केल्याने मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले आरक्षण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यावेळी आम्हाला ज्यांनी मदत केली होती. त्यांनी यावेळीही मदत केलीय. त्यामुळे हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांच्यावर बोलणे टाळले

मनोज जरांगे सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांचा उल्लेख करण्याचे एकनाथ शिंदे यांन टाळले मराठा आरक्षणातील अडथळे सरकारने दूर केले आहेत. अशा वेळी आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं. दुर्दैवानं ते झालं नाही, असे म्हणत मुख्यमंत्री यांनी शिंदे आपली नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde
Eknath Shinde : शरद पवारांचं टेन्शन वाढलं; आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे-नार्वेकरांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com