छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जिरेटोपावर काही समाजकंटकांनी जैन समाजाचा झेंडा लावला होता, काही दिवसापूर्वी हा प्रकार मुंबईतील मालाड येथे घडला आहे. या घटनेनंतर राज्यभर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले होते. आज मालाड येथील जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिवतीर्थ येथे झालेल्या या भेटीत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी राज यांची माफी मागितली. मालाड येथे 17 जून 2026 रोजी हा प्रकार घडला होता. राज यांच्यासोबतच्या भेटीत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी दिलगिरी व्यक्त केली आहे.यावेळी राज ठाकरे यांनी प्रतिनिधींना समज देत भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी ताकीद दिली.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा जिरेटोप हा स्वाभिमान, शौर्य आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीकाचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोत.
शिवाजी चौक, सेंटर प्लाझा जवळ, दफ्तरी रोड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोप पुतळ्यावर काही समाजकंटक व्यक्तींकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला. यामुळे मराठी समाजाच्या व शिवप्रेमीं यांच्या भावना दुखावल्या गेल्या याची आम्हाला जाणीव आहे, असे माफीपत्रात म्हटलं आहे.
या घटनेमुळे मा. राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही माफी व्यक्त करतो. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आपण आमचा ह्या क्षमायाचनेचे निवेदन स्वीकारून आम्हाला क्षमा करावी, ही नम्र विनंती.
“या घटनेमागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत राज ठाकरे यांना लेखी माफीनामा सादर केला,” असे जैन समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.