Ketan Agarwal: सियाचे वडील ICUमध्ये; आई म्हणाली, ‘तिलाही लोहगडावरून ढकलून द्या’! चेतन चौधरीचा कर्मचारी बनणार माफीचा साक्षीदार?

Lohagad fort murder case Siya Goyal news: केतन अग्रवाल हत्याकांडात केतनची होणारी बायको सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. चेतन चौधरीचा कर्मचारी नीरज कुमारचा जबाब आणि मोबाईल लोकेशन पुरावे तपासात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
Lohagad fort murder case
Lohagad fort murder caseSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

Ketan Agarwal Latest Update: तळेगाव दाभाडे : लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात आता धक्कादायक खुलास्यांची मालिका सुरू झाली असून मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची कथित प्रेयसी सिया गोयल यांच्या अडचणी प्रचंड वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिया गोयलच्या कृत्यावरुन तिच्या कुटुंबालाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणानंतर सियाचे वडील प्रवीण गोयल यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सियाच्या आई-वडिलांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे. मग ती आमची मुलगी असली तरीही आम्हाला त्याला विरोध नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

सियाची आई पूजा गोयल यांनी संतप्त भावना व्यक्त करत, “जर माझ्या मुलीचा या प्रकरणात दोष सिद्ध झाला, तर कायद्याने तिला सर्वात कठोर शिक्षा द्यावी,” अशी भूमिका मांडली. तर सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही, “सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे मत व्यक्त केले.

Lohagad fort murder case
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम! किचन कसं असावं?

केतन यांच्या बहिणीला आलेला संशय, चेतनच्या कर्मचाऱ्याने दिलेली माहिती आणि मोबाईलच्या तांत्रिक तपासातून समोर आलेले पुरावे यामुळे संपूर्ण तपासाची दिशा बदलली आहे.चेतन चौधरीच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार हा आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार ठरण्याची शक्यता आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नीरजने तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून हत्येपूर्वी आखलेल्या कथित कटाबाबत अनेक धक्कादायक माहिती त्याच्या जबाबातून समोर येऊ शकते. त्याचा अधिकृत जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून तपास यंत्रणा त्याला ‘माफीचा साक्षीदार’ बनणार असल्याची शक्यता आहे.

हत्येच्या दिवशी चेतन चौधरीने स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी भन्नाट प्लॅन आखला होता. स्वतःचा मोबाईल त्याने आपल्या कर्मचाऱ्याकडे ठेवला, जेणेकरून दुकानात येणारे फोन नेहमीप्रमाणे उचलले जातील आणि तो दुकानातच असल्याचा आभास निर्माण होईल.

Lohagad fort murder case
Teacher News: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! तक्रार निवारण समितीलाच निर्णयाचे अधिकार; कोर्टात जाण्याची गरज नाही

पण याठिकाणी त्याचा डाव उलटला! तपासात उघड झाले की, चेतनने कर्मचाऱ्याचा मोबाईल स्वतःसोबत घेतला होता. त्या मोबाईलचे लोकेशन थेट लोहगड परिसरात आढळून आले. सुरुवातीला या लोकेशनबाबत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र नीरज कुमारच्या जबाबामुळे तो फोन प्रत्यक्षात चेतनच वापरत असल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी केली असता दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांत हजारो कॉल्स झाल्याचे उघड झाले आहे. शेकडो तास झालेल्या संभाषणामुळे दोघांमधील संबंध आणि त्यातून हत्येचा कट रचला गेल्याचा संशय अधिक बळकट झाला आहे.

मोबाईल लोकेशन, सीडीआर, डिजिटल पुरावे आणि नीरज कुमारचा जबाब हे न्यायालयात अत्यंत निर्णायक ठरू शकतात. या सर्व पुराव्यांची सांगड घातल्यानंतर आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सिद्ध करण्यास मोठी मदत होईल, असा तपास यंत्रणांचा विश्वास आहे.

आता नीरज कुमारचा जबाब, बहिणीने व्यक्त केलेला संशय आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे चेतन चौधरी व सिया गोयल यांच्याविरोधातील पुरावे अधिक मजबूत होत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यभर गाजत असलेल्या या हत्याकांडात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा मुद्दा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच केवळ आरोपीच नव्हे तर त्यांना मदत करणारे किंवा पुरावे लपविण्यास हातभार लावणाऱ्या नातेवाईकांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com