Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : मातोश्रीबाहेर लोटला जनसागर; उद्धव ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरे यांनी आजपासून बेबंदशाहीला सुरुवात झाली असून हा अमृतकाळ नसून विषकाळ असल्याची टीका केली.

या निर्णयानंतर ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही टीका केली. आयुक्तांनी सहा महिने फक्त थोतांडपणा केला. त्यानंतर लोकशाहीची हत्या करणारा निर्णय दिल्याचे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर रात्री काही शिवसैनिकांनी मशाल घेऊन मातोश्रीबाहेर येऊन निकालाचा निषेध केला. आज मातोश्रीबाहेर सकाळपासून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

आज सकाळपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व्यस्त दिसले. त्यांनी प्रथम मातोश्रीबाहेर उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजपवर (BJP) टीका केली. त्यानंतर त्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले. दरम्यानच्या काळात मातोश्रीबाहेर मोठा जनसागर लोटला होता. ही गर्दी वाढत असल्याचे पाहून अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपस्थित शिवसैनिकांना कलासागर चौकात जमा होण्यास सांगितले.

कलासागार चौकात उद्धव ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शन केले. तेथे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ओपनजीपमधून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला. दरम्यान कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस (Tejas Thackeray) आज राजकीय व्यासपीठावर वावरताना दिसले. यावेळी ते संपूर्णवेळ शिवसैनिकांत दिसून आले. त्यामुळे तेजस ठाकरेही आता राजकारणात सक्रिय झाले का, अशी चर्चा सुरू झाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT