सोलापूर : आमची लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी नसून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी आहे, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हाच आमचा पक्ष आणि हेच आमचे चिन्ह आहे, असा ठराव करत ‘एक वडा, दोन पाव; निवडणूक आयोग XXX’ या घोषणेने सोलापूर (Solapur) शहर शिवसेनेचे (Shivsena) कार्यालय दणाणून गेले होते. (Shiv Sainik aggressive against Central Election Commission)
या वेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, युवा सेनचे राज्य विस्तारक शरद कोळी, अमर पाटील, प्रताप चव्हाण, निरंजन बोद्धुल यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्यावरही असा प्रसंग आला होता. मात्र, त्यानंतर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यात काँग्रेस विजयी झाली होती. याची पुनरावृत्ती शिवसेनेच्या बाबतीत होणार आहे. यामुळे शिवसैनिकांनी खचून न जाता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहावे.
वाय. एस. रेड्डी व इंदिरा गांधी यांचा इतिहास लक्षात घेता, यापुढे महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा पक्ष ठरणार आहे. आगामी काळ हा उद्धव ठाकरे यांचाच असेल; कारण आज शिवसैनिकांपेक्षा सामान्य माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्यादे आहेत. आता आपली लढत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नसून मोदी-शहा यांच्याबरोबर आहे, असेही बरडे यांनी स्पष्ट केले.
इतिहासात नोंद होणार
शिवसेनेवर ओढावलेल्या या प्रसंगाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण, येणारा काळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच असेल. मशाल चिन्हावरील पहिला आमदारही निवडून आला आहे, त्यामुळे भविष्यातील पुढील पिढी नक्की विचार करेल. शिवसेनेच्या पडत्या काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोण कोण होते. यामुळे आपला पक्ष, चिन्ह व भवितव्य फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असा ठराव या बैठकीत करण्यात आला.
....अन् गाढवं उधळली....
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग असा फलक गाढवाच्या गळ्यात बांधण्यात येणार होता. त्यासाठी दोन गाढवे कार्यालयासमोर आणण्यात आली होती. मात्र, कार्यालयासमोर जमलेले पदाधिकारी, कार्यकत्यांची गर्दी आणि पोलिसांना पाहून गाढवे उधळली, ती परत आलीच नाहीत. कार्यालयाबाहेर पोलिस आहेत, या भीतीने गाढवाच्या मालकानेही गाढवांना पुन्हा कार्यालयाकडे आणण्यास नकार दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.