Jayant Patil met Deputy Chief Minister Eknath Shinde in Mumbai, triggering fresh political speculation over the future of Maharashtra politics and NCP's political strategy. Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : CM फडणवीसांच्या भेटीनंतर जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर, पवारांचा विश्वासू आमदारसोबत असतानाही स्वतंत्र बैठक

Jayant Patil met Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांच्या शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटलांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, काल पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. माझ्या मतदारसंघातील कामासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो असं पाटील यांनी सांगितलं होतं.

Jagdish Patil

Mumbai News, 17 Jul : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवास्थानी भेट घेतली होती. या भेटी वेळी तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नेते देखील उपस्थित होते.

या भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत जाणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा सुरू असतानाच काल रात्री जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीवेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. मात्र, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांच्या शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटलांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, काल पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. माझ्या मतदारसंघातील कामासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो असं पाटील यांनी सांगितलं होतं.

मात्र, आता त्यानंतर काल रात्री पुन्हा जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे शिवाय राज्याच्या राजकारणात पु्न्हा काही मोठी घडामोड घडणार की काय? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT