DCC Bank Resolution : जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी मोठा राडा; संचालकांची पळवापळवी, 46 जणांवर गुन्हा, पोलिसांवर अरेरावी अन् धावाधावी

46 Booked After Chaos During Ahilyanagar DCC Bank Resolution Meeting : ठराव प्रक्रियेदरम्यान बेकायदेशीर जमाव, पोलिसांना अडथळा आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; गणपूर्तीअभावी सेवा संस्थेचा ठरावही बारगळला
Parner News
Parner NewsSarkarnama
Published on
Updated on

Parner News : अहिल्यानगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सुरू असलेल्या ठराव प्रक्रियेदरम्यान पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसमोर गोंधळ झाल्याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात 46 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

सुपे पोलिस (Police) ठाण्याचे हवालदार विकास गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कचरू मेहेत्रे, सखाराम मेहेत्रे, किरण मेहेत्रे, खुशाल मेहेत्रे, पोपट मेहेत्रे यांच्या पत्नी, सचिन पठारे, रोहन लंके, जितेश सरडे, राजू शिंदे, लाला भोंडवे, दत्ता दिवटे, जनार्दन दिवटे, सागर गवळी, गणेश दुबे, अवधूत गवळी, प्रकाश गुंड, संतोष तरटे, किशोर लगड, विकास दगाबाज, अतिश साबळे, आत्माराम जगदाळे यांच्यासह अन्य 25 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, सोसायटीच्या कार्यालयात जिल्हा बँकेसाठीचा (Cooperative) ठराव सुरू असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून सदस्यांना सभास्थळी जाण्यास अडथळा निर्माण केला. तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी आणि महिला होमगार्ड यांना काही महिलांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

Parner News
Ahmednagar DCC Bank: अहमदनगर जिल्हा बँकेचं राजकारण तापलं,भाजप नेत्यानं मतदानासाठी भावालाच पळवलं; पारनेरमध्ये गुन्हा दाखल

यावेळी "आम्ही सोसायटीचा ठराव होऊ देणार नाही" असे म्हणत काही जण पोलिसांच्या दिशेने धावून गेले. ठराव प्रक्रियेत अडथळा निर्माण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही पोलिसांनी नोंदवला आहे.

Parner News
Ahilyanagar DCC Bank Election : अमित शाह भेट, 'आणखी बरेच काही'ची पोस्ट अन् आता जिल्हा बँकेवर विवेक कोल्हेंचं मोठं वक्तव्य

ठरावावरून आधीपासूनच वाद

रुईछत्रपती सेवा संस्थेच्या जिल्हा बँक ठरावावरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. ठराव आपल्या बाजूने व्हावा, यासाठी संस्थेच्या काही संचालकांना पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित संचालकांना ठराव सभेसाठी आणण्यात आले होते. दोन्ही गटांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस बंदोबस्तातही ठराव बारगळला

परिस्थिती लक्षात घेऊन गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, दोन्ही गटांकडे समान संख्येने संचालक उपस्थित राहिल्याने गणपूर्ती होऊ शकली नाही. परिणामी, रुईछत्रपती सेवा संस्थेचा जिल्हा बँकेसाठीचा ठराव गणसंख्येअभावी बारगळला आणि सभा तहकूब करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com