Jayant Patil Metro Ride Sarkarnama
मुंबई

Jayant Patil Metro Ride : जयंत पाटलांचा मेट्रो प्रवास भाजपच्या जिव्हारी! '36 वर्षांत बसस्थानक बांधता आलं नाही, आले मोठे अंडरग्राउंड मेट्रो पाहायला!'

Jayant Patil Mumbai Aqua Line metro ride sparks a BJP attack. Navnath Ban targets the NCP-SP leader over metro project credit and development : मुंबईतील ॲक्वा लाईनने एकट्याने प्रवास करताच भाजपचा पलटवार; 'मेट्रोला विरोध करणारे आज श्रेय घेताहेत' म्हणत नवनाथ बन यांचाही घणाघात

Pradeep Pendhare

Jayant Patil Mumbai Metro : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने एकट्यानेच भूमिगत प्रवास केला अन् भाजप चवताळून उठली. जयंत पाटील यांच्या या प्रवासावर भाजपसह त्यांचे प्रवक्त नवनाथ बन यांनी देखील सुनावले.

तुम्ही 36 वर्षांपासून जिथून निवडून येत आहात, त्या मतदारसंघातील बसस्थानक तरी आधी नीट बांधून दाखवा. त्या बसस्थानकावर साधे शौचालय बांधता आले नाही आणि आले मोठे अंडरग्राउंड मेट्रो बांधायला! असा टोला भाजपने असा जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

भाजपने (BJP) त्यांच्या एक्सवरून, जयंत पाटील यांच्या व्हिडिओवर पलटवार केला आहे. विकास प्रकल्पांना विरोध करणारे "गतिरोधक" आज त्याच प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा सुरूवातीलाच वार केला.

एकेकाळी हीच मेट्रो यांच्यासाठी 'पांढरा हत्ती' होती. निर्लज्जपणालाही लाज वाटावी, अशी यांची स्थिती आहे आणि हाच यांचा पराभव आहे! ज्या प्रकल्पांना विरोध केला, आज त्याच प्रकल्पांचे कौतुक करायची वेळ यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रत्येक प्रकल्पाचे तुम्हाला असेच कौतुक करावे लागेल ही तर फक्त सुरुवात आहे, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांना भाजपने खिचवले आहे.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील, जयंत पाटील यांच्या या व्हिडिओवर निशाणा साधला आहे. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता! अशी हिंदी लाइन वापर, तुम्ही फक्त मेट्रोची फक्त चर्चा केली, पण देवाभाऊंनी प्रत्यक्ष काम करून दाखवलं आणि मुंबईच्या विकासाचा “करेक्ट” कार्यक्रम केला! असा टोला लगावला आहे.

प्रस्ताव मांडणं सोपे.....

प्रस्ताव मांडणं सोपं असतं, पण तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इच्छाशक्ती, निर्णयक्षमता आणि कणखर नेतृत्व लागते. मुंबईच्या मेट्रोचे विस्तारणारे जाळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे जुन्या प्रस्तावांचे श्रेय घेण्यापेक्षा देवाभाऊंनी करून दाखवलेल्या कामाचं वास्तव स्वीकारा! तुम्ही चर्चा करत राहिलात, देवाभाऊंनी मुंबई बदलून दाखवली! अशी टिप्पणी बन यांनी प्रतिक्रियेच्या शेवटी केली आहे.

जयंत पाटीलविरुद्ध भाजप सामना रंगणार?

जयंत पाटील यांच्या या व्हिडिओचे पडसाद नागपूर अधिवेशनात उमटतील अशी चिन्हे आहेत. भाजप हा विषय कुठपर्यंत नेणार, अन् त्याला जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून कशापद्धतीने प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT