

Eknath Shinde 500 Crore Allegation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, ऑक्टोबर 2026मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा गंभीर आरोप केला असून, या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी, जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील हे कुणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहे, असा एका वाक्यात जरांगे पाटलाच्या कार्यपद्धतीचा मंत्री कदम यांनी पानउतारा केला.
गृह राज्यमंत्री योगेश कदम अहिल्यानगर येथे आले असताना, माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांची काल विशेष तपास पथकाने चौकशी केली. जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) विशेष तपास पथकाकडे पेन ड्राईव्ह सुपूर्द केल्याचे आणि पंचनाम्यावर स्वाक्षरी केली. या सर्व घडामोडीवर मंत्री कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मंत्री योगेश कदम म्हणाले, मी मागेच म्हणालो होतो की, जरांगे पाटील कुणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. मराठा समाजासाठी उठाव केला. सरकारने देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण आता त्यांची दिशाभूल होत आहे. चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदेंवर आरोप करत आहे. त्यांची बदनामी करण्याचा जो त्यांनी प्रयत्न सुरू आहे, तो कधीही यशस्वी होणार नाही, असेही मंत्री कदम यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या उद्देशावर गंभीर टिप्पणी करताना, मंत्री कदम यांनी मोठे विधान केले. जरांगे पाटील यांचा आता मराठा समाजासाठी हिताचा उद्देश दिसत नाही. विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. अनेक गोष्टी आता समोर येतील. स्त्रोत आता लपून राहणार नाही. आज आणि उद्या स्त्रोत समोरच येणार आहे. जरांगे पाटील यांनी देखील यासंदर्भात नावे द्यावीत, असेही मंत्री कदम यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत घेत, दावा केला होता की, 2024च्या निवडणुकीच्या आसपास मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी किंवा मुद्दे मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख एका ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या कथित संभाषणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रक्कम पोहोचल्याचा दावा एका महिलेने केला आहे. यावरून जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत आरोपांची राळ उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपांवर विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.