Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : 'अ‍ॅम्ब्युलन्स'नंतर आता महायुती सरकारमध्ये 'डांबर' घोटाळा, मंत्र्याचा 'वरदहस्त'? जयंत पाटलांनी टाकला नवा बॉम्ब

Deepak Kulkarni

Mumbai News : विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी - विरोधक विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर तुटून पडताना दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर कॉन्फिडन्स वाढलेल्या महाविकास आघाडीकडून महायुतीला नामोहरम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी पक्षांकडूनही विरोधकांचे हल्ले- आरोप परतवून लावण्यासाठी कंबर कसली आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक नवा बॉम्ब टाकला आहे. महायुती सरकारमधल्या आरोग्य विभागातील अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यापाठोपाठ आता सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.5) विधिमंडळाच्या अधिवेशनातील पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान शिंदे -फडणवीस- पवार सरकारमधील डांबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याचवेळी त्यांनी हा घोटाळा सरकारमधल्या एका मंत्र्‍यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते.आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे (पालकमंत्री उदय सामंत) सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहे.संबंधित मंत्र्यांच्या 'वरदहस्ता'मुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी,नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला आहे असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.

या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले.या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत एॅपरोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नुतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबाराच्या बिलाचा नंबर एकच आहे असल्याची धक्कादायक माहितीही जयंत पाटील यांनी आता केली आहे.

शेलारांना चिमटा...

आशिष शेलार (Ashish Shelar) तुम्हाला हे लोक मंत्री कधी करणार असा सवाल उपस्थित करत जयंत पाटलांनी शेलार यांना चिमटा काढला. ते म्हणाले,तुमची मला काळजी वाटते. आशिष शेलार तुम्हाला काय मिळाले. तुम्ही मुंबई सांभाळता तुम्ही महाराष्ट्रदेखील सांभाळू शकता, पण तुम्हाला मंत्री केल नाही.

...पण जनतेने आम्हाला साथ दिली!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात आहोत.आम्ही निवडणुकीत पाहिले पैसे कसे वाटले गेले. 5 हजार घरांघरात वाटले गेले,पाच हजारांची पाकिटे करून घरात देणे या राज्यात लोकशाहीच्या ठिकऱ्या उडविण्याचे काम कोणी केले हे लोकांना माहिती आहे.पण जनतेने आम्हाला साथ दिली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT