Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : ''राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात आम्ही गोंधळलो होतो; अनेक आमदारांचा शरद पवार अन् जयंत पाटलांशी संपर्क''

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देखली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil press conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांना विधान सभेतील 40 आमदारांचा आणि विधान परिषदेतील 6 आमदारांचा पाठिंबा आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

जयंत पाटील म्हणाले, आज त्यांनी नेहमी प्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देखली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहणार आहे. काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी पक्ष म्हणून सर्व कार्यकर्त्यांकडून आणि विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून सांगतो, हा बहुसंख कार्यकर्ते व्यथित झाले आहेत. झालेल्या घटनेचा निषेध करत आहे. मला खात्री आहे, ज्या सदस्यांना बोलावले. ते सदस्य कार्यक्रमात दिसत होते. त्यातील अनेकांनी आम्ही गोंधळलेले होते, असे सांगिलते आहे. अनेक आमदार माझ्याशी आणि शरद पवार यांच्याशी बोलेल आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

झालेल्या प्रकाराशी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा कोणताही पाठिंबा नाही. पाच तारखेला महाराष्ट्राची कार्यकारीनीने दुपारी १ वाजता बैठक बैलावली आहे. यशवंतराव चव्हण सेंटरला बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील. ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये शरद पवार यांना सगळ्यांचा पाठिंबा आहे.

राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरचे सगळ्या प्रतिनीधींची बैठक होणार आहे. सत्तेत असणाऱ्यांना संख्याबळ असतानाही, आणखी एक पक्ष फोडला. शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. तो सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातील दुसरा पक्ष फोडण्याचे काम केले, असा आरोप पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT