Jayant Patil , Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

Jayant Patil Slams PM Narendra Modi : अनेक कामावरून महायुती आणि आघाडीमध्ये श्रेयवाद रंगला आहे.

Rahul Gadkar

Sangli News : अहमदनगरमधील निळवंडे धरणाच्या विकासकामांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टोला लगावला आहे. "मोदींजी आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्या, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे. यातच आमचा खरा आनंद सामावलेला आहे," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन होणार आहे. त्यातील अनेक कामांवरून महायुती आणि आघाडीमध्ये श्रेयवाद रंगला आहे.

काय म्हटलं आहे जयंत पाटलांनी

नरेंद्र मोदी आज (ता. २६) महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकासकामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पणसुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे.

९० टक्के काम मीच पूर्ण केले

१९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडीमधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता. मात्र, त्या परिस्थितीतही आम्ही विकासकामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले.

मोदींजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

१२५ गावांचा प्रश्न सुटणार

धरणबांधणीसाठी ५३ वर्षांचा कालावधी लागला असला तरी आता या धरणामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटेल. ६८००० हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न संपणार आहे. हा बंधारा सुरू झाल्याने नाशिक ते अहमदनगर दरम्यानच्या १२५ गावांना पिण्याचे पाणी मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT