Ajit Pawar, Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : अजितदादांच्या मागणीवर जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "अध्यक्षपदाला पाच वर्षे झाली, आता..."

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मोठे विधान केले आहेत. अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय देईल. यानंतर बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मिश्किल टिपण्णी केली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद अजित पवार यांच्याकडे जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मुंबईमध्ये सुरु आहे. या मेळाव्यात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार म्हणाले, "नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे. इतकी वर्षे काम केले पण मला सगळ्यांना सांगायचे आहे की विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली. कोणी म्हणते मी कडक वागत नाही. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो."

हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अजितदादांच्या या विधानानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मिश्किल टिपण्णी केली आहे. जयंत पाटील म्हणाले, "मी प्रदेशध्यक्ष म्हणून पाच वर्षे एक महिना काम करत आहे. अजितदादांनी माझे महिनेही मोजले आहेत. या कार्यकाळात मी सर्वांना सांगत होतो की बुथ कमिट्यांवर लक्ष द्या. त्यामुळे पक्ष मजबूत होण्यास मदत होणार आहे."

दरम्यान, जयंत पाटील पाच वर्षापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यावेळी अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी नाही, अशी चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमिवर अजित पवार यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT