Ajit Pawar News : मोठी बातमी : अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको; पक्ष संघटनेत जबाबदारी द्या!

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मोठे विधान केले आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssarkarnama
Published on
Updated on

रश्मी पुराणीक

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मोठे विधान केले आहेत. अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पक्षाला न्याय देईल असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मुंबईमध्ये सुरु आहे. या मेळाव्यात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे. इतकी वर्ष काम केले. मला सगळ्यांना सांगायचे आहे, मला विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली.

Ajit Pawar News
Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

कोणी म्हणते मी कडक वागत नाही. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar News
Ganesh Sugar Factory : भाजपनेच केली विखेंची कोंडी? राम शिंदेंचे आरोप अन् कोल्हेंनी दिला धक्का

हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील पाच वर्षापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यावेळी अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी नाही, अशी चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com