Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कुणाची? जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'ते खरे बोलतात...'

Jayant Patil on Supreme Court hearing NCP Split : ६ ऑक्टोबरच्या सुनावणीत राष्ट्रवादीचे सर्व म्हणणे मांडणार

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष, चिन्हावर दावा सांगितला आहे. तसेच मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही त्यांनी घोषित केले. यानंतर दोन्ही बाजुंनी निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यावर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर अजितदादांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांना टोले लगावले आहेत. (Latest Political News)

शिवसेना फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ठामपणे म्हणाले होते, शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह ठाकरे गटालाच मिळायला हवे. यावर जयंत पाटलांनी अजितदादांच्या मर्मावर बोट ठेवले. पाटील म्हणाले, 'अजित पवार नेहमीच खरे, योग्य आणि रोखठोक बोलतात. त्यांनी मनसेचा एक आमदार फुटला तर पक्ष त्यांच्यासोबत जाईल का, असाही प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे त्यांना या गोष्टीची जाण आहे. या वक्तव्याची दखल आयोगाने उशिरा का होईना घ्यावी,' असे आवाहनही पाटलांनी केले आहे.

'सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी कुणाची, याबाबत अनेक कयास मांडले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक आयोगाला शरद पवारांनी आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र तसे न करता अचानकच सुनावणी लावली आहे. त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू. एका सुनावणीत हे संपेल असे वाटत नाही. योग्य निर्णयासाठी सर्व प्रतिज्ञापत्र तपासण्यापासून अनेक काम बाकी आहेत. निवडणूक आयोग सुजाण आहे. याबाबत ते योग्य तो निर्णय घेईल,' असा विश्वासही पाटलांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Political News)

देशात पक्ष चोरण्याचे पेव फुटेल, अशी भीती व्यक्त करताना पाटलांनी सांगितले, 'भारतीय इतिहासात राजकीय पक्षांचे संस्थापक आहेत, तेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनाच बाजूला करण्याचा निर्णय काही लोक घेतात. त्याची वाच्छता काही दिवस होत नाही. त्यानंतर ते स्वतःला पक्षाचे अध्यक्ष म्हणून घोषित करतात. पक्ष आमचाच आहे, असे मोठ्या आवेषाने सांगताना दिसतात. त्यामुळे या देशात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत, चोरण्याची पद्धत आता नव्याने सुरू झाल्याचे दिसत आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT