Shrirang Barne Maval : खासदार श्रीरंग बारणे १२ वर्षांनंतर दोषमुक्त; काय आहे प्रकरण?

Pimpri Chinchwad And Maval : आंदोलन झाले, तो शास्ती कर महायुती सरकारने माफ केला
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राज्यात आघाडीचे सरकार असताना २०११ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवावी आणि त्यावर शास्ती कर आकारू नये, यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष शिवसेना आणि भाजपने मोठे जनआंदोलन केले होते. त्याबाबत त्यावेळचे शिवसेनेचे नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा आणि नंतर खटला दाखल झाला. त्यातून १२ वर्षानंतर बारणेंची ते आता खासदार असताना पिंपरी कोर्टाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. (Latest Political News)

दरम्यान, ज्यासाठी हे आंदोलन झाले, तो शास्ती कर नुकताच महायुती सरकारने माफ केला आहे. बारणेंबरोबर शिवसेनेचे त्यावेळचे शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार (सध्या प्रदेश प्रवक्ते) आणि शहर सरचिटणीस नामदेव ढाके (सध्याही सरचिटणीस) यांचीही या खटल्य़ातून सुटका झाली आहे. ते गेली दहा वर्षे पिंपरी आणि वडगाव मावळ कोर्टात फेऱ्या मारत होते. त्यातून त्यांची तीन महिन्यापूर्वीच सुटका झाली. ते दोषी ठरले असते, तर त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली असती, असे त्यांची बाजू या केसमध्ये कोर्टात मांडणारे वकील सुशील मंचरकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. (Maharashtra Political News)

Shrirang Barne
Vijay Wadettiwar News : तहसीलदारच काय, मुख्यमंत्र्यांचीही कंत्राटी भरती होऊ शकते; विजय वडेट्टीवारांचा टोला

उद्योगनगरीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा बारा वर्षांपूर्वी ऐरणीवर आला होता. महापालिका प्रशासनाने अशा बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. या कारवाईविरोधात मोठे जनआंदोलन झाले. जनतेच्या तीव्र भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईतील मंत्रालय आणि नागपूरच्या विधानभवनावरही मोर्चा काढण्यात आला. (Pimpri Chinchwad Political News)

त्यावेळी महामार्ग रोखणे, गर्दी जमवणे, गर्दीचे नेतृत्व करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्यासह वाल्हेकर, पवार, ढाके यांच्यावर मावळ, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा व नंतर तेथील कोर्टात खटला दाखल झाला होता. दरम्यान, याप्रश्नी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर ही कारवाई थांबली. परिणामी 97 हजार 777 बांधकामे व तेथील साडेचार लाख रहिवाशांना दिलासा मिळाला.

काठी टेकवत वाल्हेकरांची सुनावणीला हजेरी

या आंदोलनानंतर वाल्हेकरांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. तरीही ते काठी टेकवत न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला हजर राहत होते. सर्वसामान्यांसाठी पुकारलेल्या लढ्याला यश आल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया बारणेंनी निकालावर दिली. तर, आमच्या लढ्यामुळे शास्तीकर सरकट माफ झाला, हा जिझिया कर शून्य झाला. त्याचा सर्वसामान्यांना लाभ झाला, हे आमच्या लढ्याचे यश आहे, असे ढाके म्हणाले.

सरचिटणीस असलेले ढाके २०१७ ला नगरसेवक म्हणून निवडून आले. सभागृह नेते होऊन त्यांचे प्रमोशन झाले.तर, वाल्हेकर जिल्हाप्रमुख आणि पवार हे प्रदेश प्रवक्ते होऊन त्यांचेही प्रमोशन झाले आहे. बारणेंचे, तर डबल प्रमोशन झाले. ते नगरसेवकाचे २०१४ ला थेट खासदारच झाले. २०१९ ला ते दुसऱ्यांदा मावळमधून निवडून आले आहेत. तर, २०२४ ला खासदारकीची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा बेत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shrirang Barne
MBBS Admission Fraud : MBBS प्रवेशासाठी २ कोटींच्या फसवणुकीचा 'डोस' !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com