Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil On Maharashtra Budget : जयंत पाटील यांनी एका वाक्यात बजेटची केली चिरफाड; म्हणाले, 'चादर लगी फटने...'

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Budget : विधानसभा निवडणुकीपूर्वी वित्तमंत्री अजित पवार यांनी अखेरचे अंतरिम बजेट सादर केले. यात अनेक शेतकरी, महिलांसाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. त्यामुळे हे बजेट म्हणजे लोकसभेनंतर आणि विधानसभेपूर्वी सरकारला आलेली उपरती असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'चादर लगी फटने, खैरात लगी बटने! अशा शेलक्या शब्दात अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. त्यातून ज्या काही घोषणा करता येतील त्या त्यांनी करून टाकल्याचे दिसत आहे. त्यांना खात्री झालेली आहे, की काही झाले तरी आपला पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी पैशांचे वाटप करण्याचा शेवटचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्नही दोन अडीच महिन्यांसाठीच असणार आहे. त्यानंतर जे कोणी सत्तेत येतील ते पाहून घेतील, या भावनेतून बेजबाबदारपणाने मांडलेला अर्थसंकल्प असल्याची टीकाही पाटलांनी केली.

या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला असलेल्या बजेटपेक्षा कमी 46 हजार कोटी रुपये प्रोव्हिजन केले आहेत. मागच्या वेळेस एक लाख 30 हजार कोटी यांच्या खिशात नसलेले महसूली तुटीसह बजेट मांडले होते. त्याचे काय झाले माहीत नाही. तरी आज महसूली तूट 20 हजार कोटी रूपयांची दाखवली आहे. त्यामुळे हा सगळा आकड्यांचा खेळ आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

या सरकारने आता पेट्रोल, डिझेट, गॅसचे दर कमी करण्याचा आव आणल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला. दोन महिन्यांपूर्वी मोदी सरकारनेही दर कमी केले आहेत. मात्र राज्यातील या निवडणुकीनंतर ते दर पुन्हा वाढणार आहेत. हीच पद्धत या सरकारची दिसते.

कोणत्याही स्थितीत विजय मिळणार नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा. यातून महिलांना सक्षम आधार दिल्याचे दिसत नाही. या सरकारने कोणत्यातरी वर्गाला फक्त प्लीज करण्याचे प्रयत्न केला असल्याचा घणाघातही पाटील यांनी केला.

या अर्थसंकल्पात ज्या काही महत्त्वकांक्षी योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत त्यासाठी कुठलेही मूल्यमापन केलेले नाही. त्यामुळे या घोषणा गडबडीत केलेल्या आहेत. त्यावर आता तज्ज्ञांची समिती बसणार आणि त्यात कपात करण्यात येईल. त्यामुळे या घोषणांची पूर्तता करण्याची वेळ येईल, त्यावेळी हे सरकारना मागे हटण्याची शक्यता आहे. किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे, याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT