Sharad Pawar-Sadabhau Khot-Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Sadabhau Khot Attack On Sharad Pawar : जयंत पाटलांचा पराभव शरद पवारांनीच घडवून आणला; सदाभाऊ खोतांचा आरोप

Vidhan Parishad Election Result : महाविकास आघाडीतील काँग्रेसची अतिरिक्त मतेही जयंत पाटील यांना मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना पहिल्या फेरीत फक्त बाराच मते मिळाली, त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 July : शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाचे खापर नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर फोडले आहे. ‘जयंत पाटील यांचा पराभव म्हणजे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील श्रमिकांचा घडवून आणलेला पराभव आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार आहेत, तसेच शेकापचा एक आमदार आहे. तसेच सहा ते सात मतांची बेगमी केल्या जयंत पाटील यांचा दावा होता. मात्र, निवडणुकीत प्रत्यक्षात जयंत पाटील यांना केवळ बाराच मते पडली आहे, त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची अतिरिक्त मतेही जयंत पाटील यांना मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना पहिल्या फेरीत फक्त बाराच मते मिळाली, त्यामुळे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. त्याबाबत बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडवणीस हेच राजकारणातील चाणक्य आहेत, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी या वेळी बोलताना केला.

देवेंद्र फडणवीस यांना प्रस्थापित राजकारण्यांनी अनेक वेळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आम्ही त्यांचा अभिमान्यू होऊ दिला नाही. आगामी काळातही फडणवीसांचा अभिमान्यू होऊ देणार नाही, असेही खोत यांनी या वेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे नाव बदलून ते आलीबाबांचे चाळीस चोर असे करावे लागेल. कारण, महाविकास आघाडीत सर्व लुटारूंचे टोळी आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर नेत्यांवर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT