Paricharak VS Autade : परिचारकांसमोर समर्थकांचा आवताडेंवर हल्लाबोल; परिचारक कुटुंबांतीलच आमदार करण्याचा निर्धार

Pandharpur-Mangalvedha : ज्यांच्या घरात 36 वर्षे आमदारकी आहे, त्यांना दोन वर्षे आमदार झालेल्यांनी आमदारांची कामे काय असतात, ते सांगू नयेत.
Prashant Paricharak- Samadhan Autade
Prashant Paricharak- Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 July : समाधान आवताडे यांना आमदार करण्यासाठी प्रशांत परिचारक यांनी स्वतःपेक्षा जास्त प्रयत्न केले. कार्यकर्त्यांनी काम करावे, यासाठी मोठ्या मालकांची (सुधाकर परिचारक) शपथ घातली. पण तेच आज आमदार फंडातील काम काय असतात, हे सांगू लागले आहेत. यापेक्षा मोठा कृतघ्नपणा नाही. आगामी निवडणुकीत परिचारक कुटुंबातील व्यक्तीच आमदार झाला पाहिजे, यासाठी आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करीत आहोत, अशा शब्दांत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक खर्डीचे उपसरपंच शरद रोंगे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या उपस्थितीत समर्थकांकडून आमदार आवताडे (Samadhan Autade) यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. खर्डीतील कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पंढरपूर मंगळवेढ्यातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) माजी आमदार प्रशांत परिचारक इच्छूक आहेत. तसे संकेत त्यांनी अनेक कार्यक्रमात दिले आहेत.

प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत खर्डीच्या उपसरपंचाने केलेले भाषण सध्या गाजत आहे. रोंगे म्हणाले, ज्यांच्या घरात 36 वर्षे आमदारकी आहे, त्यांना दोन वर्षे आमदार झालेल्यांनी आमदारांची कामे काय असतात, ते सांगू नयेत. विरोधक म्हणतात की आमच्या शिफारशींनं कामं दिली. पण, प्रशांतमालक आज त्यांना मी सांगू इच्छितो की, मी कामे आणली असे जे सांगत आहेत. त्यांना आमदार कोणी केलं आहे.

प्रशांत परिचारक यांनी मोठ्या मालकांची (सुधाकरपंत परिचारक) शपथ घालून त्यांना आमदार केलं. तेच आज आपल्याला हे काम माझं आहे, असं आपल्याच गावात म्हणत असतील तर याच्यापेक्षा कृतघ्नता काय असते, असा सवाल त्यांनी केला.

Prashant Paricharak- Samadhan Autade
Congress Meeting : काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल; फुटीर आमदारांबाबत मुंबईतील 19 रोजीच्या बैठकीत निर्णय होणार

प्रशांत परिचारक यांच्यावरील प्रेमापोटी आपण ज्या माणसाला आमदारकीला निवडून दिलं. तेच लोक आज आपल्यावर कृतघ्न होत आहेत. या लोकांना आम्ही आमागी निवडणुकीत थारा देणार नाही. आगामी निवडणुकीत परिचारक कुटुंबातीलच आमदार झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आजपासूनच कामाला आणि प्रचाराला सुरुवात करीत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या लोकांना प्रशांत परिचारकांनी मोठं केलं. तेच लोक आज त्यांच्या विरोधात बोलत आहेत. ज्या घरात 36 वर्षे आमदारकी होती, त्या घरातील माणसांन दोन वर्षे आमदार झालेले ‘आमदार फंडाची कामं काय असतात’ हे सांगत आहे. पहिल्यांदा तुम्ही आमदार कुठून झालास. आमदार कुणामुळं झाला.

खर्डीतील मान सन्मान ही परिचारक फॅमिली आहे. आमदारकीसाठी परिचारक फॅमिली जे करायला लागेल, ते करायला तयार आहे. पण त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे, असे आवाहनही उपसरपंच रोंगे यांनी केले.

Prashant Paricharak- Samadhan Autade
Milind Narvekar Victory : नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांच्या नाकावर टिच्चून विजय खेचून आणला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com