Jitendra Avhad
Jitendra Avhad 
मुंबई

'मंगेशकर कुटुंबीयांची 'ती' कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी': जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी (24 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये पंतप्रधान मोदी यांना ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव नसण्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. “लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे,” असं ट्विट करत आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबियांचा समाचार घेतला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे.

तर दूसरीकडे मंगेशकर कुटुंबियांनी पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सांगण्यात येत होतं. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्य मंत्र्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असतानाच शनिवारी झालेल्या आंदोलनात 92 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे या आजाही हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. त्या आजींचे जितेंद्र आव्हाड यांनी तोंडभर कौतुक केले आहे. 'ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद आहे.' असे म्हटले आहे.

या संदर्भात आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ''येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले 2-3 दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक 92 वर्षाची म्हातारी आजी देखिल उभी होती. तीचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. पण ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT