'ह्यालाच म्हणतात निष्ठा, शिवसेनेची सर्वात मोठी ताकद'

या आंदोलनात 92 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde) या आजाही हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.
Chandrabhaga Shinde, Jitendra Awhad
Chandrabhaga Shinde, Jitendra Awhadsarkarnama

मुंबई : मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. यावरून शनिवारी दिवसभर मुंबईत मोठा राडा झाला. यावेळी अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात 92 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे या आजाही हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद आहे.

या संदर्भात आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ''येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले 2-3 दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक 92 वर्षाची म्हातारी आजी देखिल उभी होती. तीचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. पण ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद''

Chandrabhaga Shinde, Jitendra Awhad
राजद्रोहाचा गुन्हा दाखल ; रवी राणा तळोजा तर नवनीत राणा भायखळा कारागृहात..

''आजकालच्या जगात तळहातावरच्या फोडासारखे जपलेली लोक ही कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही. मी त्या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार व त्यांच्या पाया पडणार. कि अशीच निष्ठा माझ्या हृदयी राहो. हे भाग्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्यांच्या नशिबी आहे,'' असेही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे तिघे चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde) यांची भेट घेणार आहेत. त्या शिवडी येथे राहणाऱ्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेशी जोडल्या गेल्या आहेत. तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याचा विरोध त्या करत होत्या.

Chandrabhaga Shinde, Jitendra Awhad
नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला न जाता ठाकरे कुटुंबीय घेणार एका 'खास' व्यक्तीची भेट!

त्यामुळे काहीवेळ त्यांना मातोश्रीमध्येही बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबीय त्यांची सायंकाळी सहा वाजता भेटणार आहेत. दरम्यान, या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा दिला. झुकेगा नही साला, असे त्या म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com