Jitendra awahad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awahad News : जितेंद्र आव्हाड म्हणाले; '... तर पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे'

Pankaj Rodekar

Thane News : इंडिया आघाडीने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार जाहीर केला नसल्याने मोठी चर्चा रंगली आहे. आघडीकडून वेगवेगळी नावे पुढे येत असल्याने चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिल्याने चर्चा जोरात सुरु आहे. त्याच चर्चेत आता माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

भारतावर आणि भारताच्या मातीवर प्रेम करणे अनेक चेहरे इंडिया आघाडीकडे आहेत. म्हणूनच आम्ही उमेदवार जाहीर केलेला नाही. दोस्ती केली आहे तर ती निभावणारच. मग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)असो या शरद पवार किंवा राहुल गांधी (Rahul Gandhi) असो पंतप्रधानपदासाठी आम्ही एकमेकांना पाठींबा देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra avahad) यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने सत्ता सोडली त्यापेक्षा कर्ज तुम्ही तीनशे पटीने वाढवले एक लाख होतं हे तुम्ही तीन लाख कोटी केले. जेवढे 70 वर्षात होते ते कर्ज तुम्ही या 10 वर्षात केले, अशी टीका भाजपवर केली. याशिवाय भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायात रस्सी बांधून ठेवली. तर भाजपने जे आम्ही वाढू तेच तुम्हाला जेवायचे आहे, अशी अवस्था मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झाली असल्याची टीका आव्हाड यांनी दोघांवर केली.

भाजपने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाची कल्याणची सीट अडचणीत आणून ठेवली आहे. भाजप त्याठिकाणी उघडपणाने विरोध करताना दिसत आहे. त्यांना उघडपणाने बोलता येत नाही. त्यातच ठाणे सीट त्यांना जाहीर करता येत नाही, शिवाय आमदार संजय केळकर उठतात आणि म्हणतात ठाणे सीट आम्हालाच हवी आहे. हे कोणी सांगितल्याशिवाय होते का ? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री यांच्या पायाला रस्सी बांधून ठेवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे धाडस केले नसते. तर राज्यात सत्ता आली नसती ती दिसली असती का ? असा सवाल करत आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'गुलामापेक्षा वाईट परिस्थिती'

जे आम्ही वाढू तेच तुम्हाला जेवायचे आहे, अशी अवस्था मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केली आहे. पहिले हे दोघेही ज्या पक्षात होतात, त्या ठिकाणी तुम्हाला जे काय पाहिजे, हेच वाढल जात होते. त्या घरामध्ये तुम्ही राजे होता, आता गुलामापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. ते आता उघडपणे दिसून येत आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.

SCROLL FOR NEXT