Jitendra Avhad : अजित पवार जातीयवादी माणूस; जितेंद्र आव्हाडांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गंभीर आरोप

Political News :सगळं माफ करुन तुम्हाला सर्व महत्त्वाची पद दिली ती शरद पवारांची चूक होती का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले तर आठ दिवसातच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी निकालातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब केला. त्याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार पात्र असल्याचेही नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भावनिक आवाहन केले. ते अनेकदा भावूक झाले होते. त्यावर बोलताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती पण शरद पवार यांनी चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली. तुम्ही कुठे कुठे काहीही बोलत होतात पण तरीही सगळं माफ करुन तुम्हाला सर्व महत्त्वाची पदे दिली. एससी एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याच काम अजित पवार यांनी केले. सर्वात जातीयवादी माणूस अजित पवार आहेत.

काय सारखं सारखं वंश करताय तुमच्यासारख्या चुका जितेंद्र आव्हाड यांनी केल्या असत्या तर त्यांना पक्षातून हाकलले असते. शरद पवार गट सर्व तुमच्या हातात असताना तुम्ही त्या सगळ्याचे तुकडे केले, असा घणाघाती आरोप आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad and Ajit Pawar
Shiv Sena : मित्र असलेल्या उद्धव ठाकरे गटाला ‘वंचित’चा जोर का झटका, पण अगदी धीरे से...

का म्हणजे कारखानदार का म्हणजे कापुस ?

तुमचे आणि प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचे किती सुमुधुर सबंध होते हे आम्हाला माहिती नाही का ? असा सवाल करीत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. अरे काय का का का ? का म्हणजे कारखानदार का म्हणजे कापुस असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतला तुमचा एक निर्णय सांगा जो महाराष्ट्राला आवडला. तुमचं धोरण आवडलं अस एखादी गोष्ट सांगा. तुमच्यातला तुसडेपणा आणि आणि ताईंचा आपलेपणा सगळ्या महाराष्ट्राला माहितीय. अजित पवार आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा महाराष्ट्राला आवडत नाहीये. तुम्ही काकांचे आयुष्य बरबाद करायला निघाले आहात.

राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाईन हे नाव रद्द करा, अशी मागणी नाही केली का ? शरद पवार तुम्हाला हे नावच नकोय, हे नाव रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे, साहेबांचे नाव राजकीय पटलावर दिसू नये असे प्रयत्न सुरू आहेत.अशी टीकाही जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ताधाऱ्यांच्या टिपेवर भाषण करणारा त्यावेळचा विरोधी पक्षनेता म्हणजे अजित पवार. (Ajit Pawar) त्यांना अडचणीत आणणारा एकही मुद्दा तुमच्या भाषणात नसायचा. तुमचा पीए तुम्हाला भाषण लिहून देत होता असा आरोपही त्यांनी केला.

बारामतीत एकटे पाडण्याचा प्रयत्न होतोय म्हणण्यापेक्षा मराठा समाजाने तुम्हाला बारामतीत येऊ दिल नाही ते बघा. तुमच्या पोस्टरला काळ फासण्यात आल हे कोणी बोलत नाही मी बोलतो. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची नक्कल करत ‘बारामतीतल्या लोकांना म्हणताय मला साथ द्या नाहीतर मी तुम्हाच्याशी सबंध तोडेन परत इथे येणार नाही’ अशी नक्कलच आव्हाड यांनी करुन दाखवली.

माझे आणि प्रफुल भाईंचे अतिशय चांगले सबंध होते. याउलट प्रफुल भाई आणि अजित पवार यांचे वाकड होत. जोपर्यंत ते साहेबांच्यासोबत होते तोपर्यंतच होते. आता आव्हाड तुमच्याकडे कधी येणार नाहीत. प्रफुल पटेल म्हणाले की, आव्हाड आमचाच माणूस आहे, मी सांगतो तुमचा माणूस नाही. ज्यांनी-ज्यांनी आरक्षणाच्या नावावर भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठ पाप केले, अशी टीका आव्हाड यांनी केली.

Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad PC : 'हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरूममध्ये लपायचे'; आव्हाडांनी सगळंच काढलं!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com