Jitendra Awhad
Jitendra Awhad  sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातयं ; असे आव्हाड का म्हणाले..नवा वाद

सरकारनामा ब्युरो

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटात इतिहासात (Shivaji Maharaj History) छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याविरोधात पुण्यासह मुंबईमध्ये देखील आंदोलनं केली जात आहेत. राज्यात सध्या हर हर महादेव या चित्रपटावरुन वाद सुरु आहे. चित्रपटांविरोधात आंदोलनं केली जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर थिएटरमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. आता "वेडात दौडले वीर मराठे सात" या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करीत आक्षेप घेतला आहे.

अक्षयकुमारच्या भूमिकेवरही बोट..

"जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढले जातये असे वाटते," असे आव्हाड यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. शिवाजी महाराज आणि अक्षयकुमार यांची देहयष्टी यासह भूमिकेवरही बोट ठेवले आहे.

कसा दिसतो ?

शिवाजी महाराजांची उंची आणि अक्षयकुमारची उंची यात मोठा फरक आहे. त्याकाळी प्रत्यक्षात शिवरायांचे वय आणि भूमिकेतील व्यक्तिरेखेतील अक्षयकुमार याच्या वयाचा ताळमेळ नाही. शिवाजी महाराज दिसायला कसे होते आणि अक्षयकुमार पहा कसा दिसतो ?,असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या समर्थकांसह ठाण्यात विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.त्यानंतर आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT