मुंबई : राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली. अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
या संदर्भात आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला: चंद्रकांत पाटील. अहो साहेब छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तयार केले. व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी'' असा टोला पाटील यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते.
तिकीट पक्षाचे असते त्या मुळे माझे तिकीट कापले हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. व्होट बँक पक्षाची असते. तुमचे कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही मेहनत घेऊन तयार केलेली असते. व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची असते, असे पाटील म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.