मेधा कुलकर्णींचे पुनर्वसन? : चंद्रकांतदादा म्हणतात, ` पक्ष कोणाचेही तिकीट उगाच कापत नाही..``

माजी आमदार मेधा कुलकर्णींचे (Medha Kulkarni) तिकीट कापल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या राजकीय पुनर्वसनावर भाष्य केलं आहे.
Chandrakant Patil 

Chandrakant Patil 

Sarkarnama 

पुणे : ‘‘तिकीट पक्षाचे असते, वर्षानुवर्षे मेहनत करून तयार केलेली वोटबँक पक्षाची असते. निवडणुकीमध्ये ही वोटबँक तुम्हाला मिळते. त्यामध्ये तुमचा चेहरा थोडासा उपयोगी पडतो. पक्ष कोणाचीही तिकीट उगाच कापत नाही, त्यामागे काही तरी कारण असते. माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धती पक्षात चालत नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली. त्यांचे विधानसभेला तिकीट कापले, श्रद्धा व सबुरी कामाला आली, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर पत्रकार परिषदेत मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. त्यांनाही भविष्यात संधी मिळेल का ? असा प्रश्‍न विचारण्यात आला.

<div class="paragraphs"><p>Chandrakant Patil&nbsp;</p></div>
अन् बावनकुळे झाले भावुक, हजारोंनी अनुभवला फडणवीसांसोबतचा स्नेहबंध...

त्यावर पाटील म्हणाले, ‘‘तिकीट पक्षाचे असते, वोट बँक पक्षाची असते, तुमचे कर्तृत्व पाहून उमेदवारी दिली जाते. वर्षानुवर्षे मेहनत करून तयार केलेली वोट बँक ही संत महंतांपर्यंत पोहचते. शिवाजी महाराज यांनी हिंदुत्वाची वोट बँक तयारी केली, त्यामध्ये अलीकडे अटलजी, अडवानी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला. ही वोटबँक तुम्हाला मिळते, त्यासाठी थोडासा तुमचा चेहरा उपयोगी पडते. त्यामुळे माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धती आमच्या पक्षाची नाही. बावनकुळे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर विष पचवले. जे जे संयम ठेवतात, त्यांना सब्र का फल मीठा याचा अनुभव येतो. पंकजा मुंडे, विनोद तावडे हे  राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. हा पक्ष उगाच कोणावर कोणावर अन्याय करत नाही. त्यामागे काही तरी कारणे असते. काळाच्या ओघामध्ये ते सर्व नीट करण्याचा पक्षाचा प्रयत्न असतो, असे पाटील यांनी सांगितले.

हेल्मेट कारवाई विरोधात रस्त्यावर उतरू

शहरात पोलिसांकडून हुकूमशाही पद्धतीने हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे, याचा आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू. पोलिस आयुक्तांनाही लवकरच भेटणार आहे. ही दंडाची रक्कम केंद्र सरकारने वाढवली आहे हे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पाटील म्हणाले, ‘‘ एवढी मोठी दंडाची रक्कम योग्य नाही, जिवा पेक्षा दंड भयंकर झाला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही भेटून सांगू, निवेदन देऊ, असही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com