Jitendra Awhad, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad - Bhujbal News : '' तो अदृश्य हात कुणाचा...समझनेवाले को...''; भुजबळांची 'ती' टीका, आव्हाडांचं सूचक ट्विट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : बीडमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा रविवारी पार पडली. या सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी भुजबळांनी तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा शरद पवारांनी मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. १९९२-९३-९४ साली शरद पवारांवरही आरोप झाले होते. पण, शरद पवारांचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळांनी पवारांना विचारला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्विट केले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी तेलगी प्रकरणावरुन छगन भुजबळांना लक्ष्य करताना सूचक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली.

त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितले की, याबाबत तुम्ही शरद पवार(Sharad Pawar) साहेबांशी चर्चा करा. शरद पवार साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली.”

'' तो अदृश्य हात कुणाचा…''

पुढे आव्हाड म्हणाले, त्यानंतर दोन महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यानंतर जी ओरिजनल चार्जशीट होती, ज्यामध्ये ती नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे, तो काढून घ्या. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला…तो अदृश्य हात कुणाचा…समझने वाले को इशारा काफी होता है,” असं म्हणत आव्हाडांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे.

भुजबळ काय म्हणाले होते ?

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बीडमधील सभेत २३ डिसेंबर २००३ ला रोजी माझ्याकडे असलेल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा का घेतला होता ते तेलगीचं प्रकरण होतं, त्याला मी अटक केली. मोक्का लावण्याचे निर्देश दिले होते. काही लोकांनी आरोप केले आणि पवारांनी राजीनामा द्यायला सांगितला. भुजबळांचा राजीनामा घेऊ नका असा फोन आला होता, पण राजीनामा घेतला गेला.

पण १९९२-९३-९४ साली शरद पवारांवरही आरोप झाले होते. पण, शरद पवारांचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला?” असा सवाल भुजबळांनी पवारांना विचारला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT