Madhya Pradesh BJP News: भाजपचे मिशन मध्य प्रदेश : 3 सप्टेंबरपासून 'जन आशीर्वाद यात्रा, अमित शाह दाखवणार हिरवा झेंडा

Amit Shah In BJP Jan Ashirwad Yatra : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 3 सप्टेंबर रोजी चित्रकूट येथून पहिल्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
BJP Jan Ashirwad Yatra News
BJP Jan Ashirwad Yatra NewsSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Election News : मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने (BJP) पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मध्य प्रदेशात भाजपची जनआशीर्वाद यात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 3 सप्टेंबर रोजी चित्रकूट येथून पहिल्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

या यात्रांचे नेतृत्व विविध नेते करणार आहेत. 3 सप्टेंबरपासून सामूहिक नेतृत्वाखाली पाच जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा समावेश असणार आहे.

BJP Jan Ashirwad Yatra News
Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पवारांवरील टीका भोवणार; येवल्यातच काळे झेंडे दाखवून आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आदी जन आशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या यात्रांचा प्रवास भोपाळ येथे संपेल. 25 सप्टेंबर रोजी यात्रांच्या समारोपानंतर भोपाळमध्ये एक मोठी रॅली होणार आहे. भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेनंतर या यात्रांची सांगता होणार आहे. त्याला कार्यकर्ता महाकुंभ असे नाव देण्यात आले आहे.

BJP Jan Ashirwad Yatra News
Ravindra Dhangekar Warning : ...म्हणून जिथे चंद्रकांतदादा जाणार, तिथे आंदोलन करणार : धंगेकरांचा थेट इशारा

यात्रेत सर्व विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. यात्रेदरम्यान, दररोज पाच मोठ्या आणि पाच लहान सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय आणि राज्य नेते सभांना संबोधित करणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सरकार आण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पक्षाने आघाडी गेत पहिली उमेदवार यादीही जाहीर केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com