Nitin Deshmukh sarkarnama
मुंबई

Nitin Deshmukh Join BJP : गोपीचंद पडळकरांना नडणारा जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता भाजपच्या गळाला

BJP Jitendra Awhad : नितीन देशमुख यांनी जितेंद्र आव्हाडांची साथ सोडत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Roshan More

Nitin Deshmukh News : विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राडा सगळ्या महाराष्ट्राने पाहिला.विधीमंडळाच्या आवरात देशमुख यांना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र, भाजप आमदाराला नडणाऱ्या नितीन देशमुख यांना भाजपने थेट पक्षात एंन्ट्री दिली आहे.

नितीन देशमुख यांनी आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. देशमुख हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र, आरक्षण आणि इतर कारणाने त्यांची पत्नी विक्रोळी वाॅर्ड क्रमांक 124 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होती.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळू शकला नाही. त्यामुळे नितीन देशमुख हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी थेट राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुखांनी अखेर पक्षांतर केले. विधान भवनातील मारामारी प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. वॉर्ड क्रमांक 124 विक्रोळी पार्कसाईटमधून पत्नी प्रियांका देशमुख यांच्यासाठी इच्छुक होते. मात्र हा वॉर्ड दुसऱ्या गटाला सुटल्याने नाराजीनंतर आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

अन्याय झाल्याची भावना...

नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीसाठी मी तयारीने पुढे आलो होते. त्या टप्प्यावर माझ्या प्रयत्नांकडे अपेक्षित गांभीर्याने न्यायतेने पाहिले नसल्याची भावना मनात दृढ होत गेली. या संपूर्ण प्रक्रियेत मला अन्याय झाल्याची तीव्र जाणीव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT