Kolhapur Election: साम, दाम, दंड, भेद सर्व नीतीचा वापर! कोल्हापुरात महाडिक, चव्हाण, फरास यांच्यासह 274 जणांची माघार

Kolhapur Election: भाजप, शिवसेना, यांच्यासह काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोरी करत पक्षाला जागा दाखवणार म्हणू पाहणाऱ्या अनेकांनी यु-टर्न घेत पक्षासाठी माघार घेतल्याचे जाहीर केले.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Election: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बंडखोरांना साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतीचा वापर करत तर काही जणांना आमिष दाखवत माघार घेण्यास भाग पाडले. भाजप, शिवसेना, यांच्यासह काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोरी करत पक्षाला जागा दाखवणार म्हणू पाहणाऱ्या अनेकांनी यु-टर्न घेत पक्षासाठी माघार घेतल्याचे जाहीर केले. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज दिवसभरात 274 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे प्रभागातील लढत स्पष्ट झाले असून 81 जागांसाठी 543 उमेदवार रिंगणात असणार आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Assembly Election 2024 : चंदगडमध्ये विधानसभेसाठी तिरंगी लढत, 18 उमेदवार रिंगणात

यंदा महापालिका निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, राजश्री शाहू आघाडी अशी लढत होत आहे. मात्र प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानेही २९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी तब्बल दहा वर्षांनी मतदान होत आहे. २०१५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये महापालिका सभागृहाची मुदत संपली. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे.

Kolhapur Municipal Corporation
Top 10 News: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका ते बजरंग बाप्पांना हेलिकॉप्टरमधून लिफ्ट

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांचा मोठा सहभाग या निवडणुकीमध्ये दिसून आला. त्यामुळे मोठया संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षाकडे उमेदवारांचा कल दिसून आला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली होती. बंडखोरी थांबविण्यासाठी गेले दोन दिवस पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. नेतेमंडळींनी लक्ष घातल्याने घडामोडी वेगावल्या होत्या. कोणाला स्वीकृत नगरसेवकपद तर कोणाला अन्य समितीवर संधी देण्यात येईल असा शब्द दिला गेला. दरम्यान दिवसभर माघारीच्या अनुषंगाने घडामोडी सुरू होत्या.

Kolhapur Municipal Corporation
Latur Election: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका! 28 जणांनी कायम ठेवली अपक्ष उमेदवारी

आज दिवसभरात माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, स्थायी समितीचे माजी सभापती इंद्रजित सलगर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा समावेश आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार योगिता कोडोलीकर, श्रुती अमित पाटील, गीता अजित तिवडे, किरण रामचंद्र माजगावकर, नम्रता राकेश महाडिक, ऋतुजा अजित जाधव तेजस्विनी विजयसिंह माने, परवेज दिलावरखान पठाण, धनश्री तोडकर यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी २०५ उमेदवारांनी माघार घेतली. तर या निवडणुकीत माघार घेतलेल्या एकूण उमेदवारांची संख्या २७४ इतकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com