NCP leader Jitendra Awhad addressing the media in Mumbra, asserting that the city represents India’s Tiranga and constitutional unity beyond religion or caste. Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : 'कैसे हराया' म्हणणाऱ्या सहर शेखच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच बोलले, 'चॉकलेट खिलाया' म्हणत थेट तुरूंगात धाडण्याची दिली धमकी

Jitendra Awhad reacts to Sahar Shaikh’s Mumbra remark : नगरपालिका निवडणुकीच्या निकालापासून मुंब्रा चर्चेत आहे. या निकालानंतर सहर शेखच्या वडिलांनी आव्हाड यांच्यातील वाद समोर आला होता. दरम्यान, सहर शेखच्या मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 28 Jan : 'कैसे हराया' आणि 'पूर्ण मुंब्रा हिरवा करणार' असं वक्तव्य मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखने केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

सहर शेख ही लहाण मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. पण हे शहर तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार, असं म्हणत आव्हाडांनी सहर शेख आणि तिच्या वडिलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालापासून मुंब्रा चर्चेत आहे. या निकालानंतर सहर शेखच्या वडील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद समोर आला होता. दरम्यान, सहर शेखच्या मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला होता.

अशातच आता या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात जाऊन भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "मुंब्रा शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि संस्काराशी आहे. हे शहर जात, धर्म आणि भाषा याच्या पलिकडे जाऊन विचार करते. या शहरात धर्मांध भाषा केली तर ते धोकादायक आहे आणि मी ते होऊ देणार नाही. इथे कोणताही एक रंग चालणार नाही, इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल."

तर युनूस शेख यांना उद्देशून कुणीही म्हणतं की जितेंद्र आव्हाडला मुंब्रात पाय ठेवू देणार नाही, म्हणून मी येणार नाही असं वाटलं का? जितेंद्र आव्हाडला एक लाखाहून अधिक मतांनी या शहराने विजयी केलं आहे. हे लोकांचे प्रेम आहे. त्यामुळे हे 'आके दिखावो, जाके दिखावो' ही भाषा चालणार नाही.

सहर शेख ही लहाण मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. पण मी जर बोलायला लागलो तर भलेभले तुरुंगात जातील, त्यामुळे धमकीची भाषा चालणार नाही, असा दम देखील आव्हाडांनी सहर शेखचे वडील युनूस शेख यांना दिला.

दरम्यान, यावेळी त्यांनी सहर शेखच्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत म्हणाले, "या शहराच्या स्टेशनावरून मिनारीकडे बघितलं तर समोर मुंब्रा देवीचं मंदिर दिसतं. इथले रस्ते हे भारताची ओळख आहेत. तुम्ही या शहराला कोणत्याही एका रंगाने माखू शकणार नाही, कारण हे शहर तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार.", असं म्हणत आव्हाडांनी सहर शेखच्या वक्तव्यांवर पहिल्यांदा भाष्य केलं. शिवाय सहर शेखची नक्कल करत चॉकलेट खिलाया असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेखच्या भाषणाची खिल्ली देखील उडवली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT