

Mumbai News: राज्यातील 29 महापालिकांसह मुंबईतील महापालिकेचीही निवडणूकही जाहीर झाली असून अखेर या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे एकत्र आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आले होते. हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर घणाघाती टीकाही केली होती. पण आता महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी फडणवीस सरकारचं मराठीच्या मुद्द्यांवकरुन कौतुक केले आहे.
मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी 5 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात अमित ठाकरेंनी शाळांमधील मराठी भाषेचा मुद्दा आग्रही पध्दतीनं मांडला होता. यावेळी त्यांनी सरकारने शाळांमध्ये अधिनियमाची अंमलबजावणी होत आहे की नाही,यावर पुण्यातील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग संचालनालय यांच्या माध्यमातून तात्काळ अहवाल मागवण्यात यावा अशी मागणी केली होती.
अमित ठाकरेंनी त्यावेळी मराठी भाषा शिकवणं टाळणार्या अशा शाळांवर योग्य ती शिस्तभंगाची किंवा मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी.सक्ती बाळगून पुन्हा असे घडणार नाही,याची खबरदारी घ्यावी, अशा मागण्या केल्या होत्या.त्यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारचं मराठीच्या मुद्द्यावर चांगलंच लक्ष वेधलं होतं.
पण आता मनसे नेते अमित ठाकरेंनी राज्य सरकारकडून त्यांच्या मराठीच्या मु्द्द्यांवर राज्य सरकारकडून कार्यवाही करण्यात आल्यानंतर कौतुक केलं आहे. सरकारचे कौतुक करताना अमित ठाकरेंनी 5 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेले पत्र आणि 27 जानेवारी 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाची प्रत शेअर केली आहे.
यात अमित ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात,महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा अस्तित्वात असूनही,अनेक शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात 5 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही सरकारकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.
आज आनंद वाटतोय की,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील ज्या शाळा मराठी भाषेच्या अध्यापनाचा निर्णय डावलत आहेत, त्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचं आम्ही स्वागत करत असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
तसेच मराठी फक्त भाषा नाही, आपली ओळख "मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली ओळख आहे. आपल्या मातीत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे, ही आमची भूमिका होती आणि राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कार्यवाही होईल आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, ही आमची अपेक्षा असल्याचं अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.