Jitendra Awhad News : Mumbai News Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : 'पुन्हा सतरंज्या उचलाव्या लागणार ; भाजप नेत्यांनी आव्हाडांना सांगितली खदखद?

Jitendra Awhad On Bjp : "लोकसभेलाच ही अवस्था असेल तर विधानसभेला काय अवस्था असेल? त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे."

Pankaj Rodekar

Mumbai News : प्रत्येक निवडणुकीत कोणता उमेदवार कुठे उभे राहणार त्याचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील व इतर तीन-चार जण निश्चित करत होते. मात्र आज त्यांना कुठली जागा, कुठले तिकीट मिळेल याची शाश्वती नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. (Latest Marathi News)

या पत्रकार परिषदेत आव्हाड (JItendra Awhad) पुढे म्हणाले, "विधानसभेत खासगीमध्ये भाजपचे आमदार सांगतात की, एवढे बाहेरून आमच्या पक्षात नेते येत आहेत त्यामुळे, पुन्हा आम्हाला सतरंजी आणि पोस्टर लावायची कामे करावी लागणार आहे. त्यामुळे एक प्रकारे पक्षनिष्ठेला संपविण्याचे काम भाजपने केले," असा दावा आव्हाड यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निष्ठा कधी संपत नसते, निष्ठेची ताकद फार मोठी असते, असे देखील आव्हाड म्हणाले. काँग्रेसच्या संस्कृतीत फोडाफोडीचे राजकारण झालेले नाही, पण गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीचे राजकारण हे महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे आहे, असेही आव्हाड म्हणाले.

लोकसभेलाच (Lok Sabha) ही अवस्था असेल तर विधानसभेला काय अवस्था असेल? त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येक आमदाराने विधानसभेच्या अनुषंगानेच पक्षांतर केले. विकास हे केवळ नावाला असल्याचे देखील आव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच, अजित पवार हे चार वेळा उपमुख्यमंत्री असून देखील ते म्हणतात की, मी माझ्या गावचा विकास करू शकलो नाही. मग मंत्री असताना, काय केले? असा सवाल देखील आव्हाडांनी विचारला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT