NCP Sharad Pawar News : अजितदादांच्या आमदाराला शरद पवार गटाने मतदारसंघातच घेरले...

Sharad Pawar NCP Protest : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आंदोलनासाठी नेमका हाच मतदारसंघ निवडला, अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधात आंदोलन...
NCP Sharad Pawar News
NCP Sharad Pawar NewsSarkarnama

Nashik News : "सत्तेसाठी गद्दारी केलेल्या आमदारांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोंड उघडले का? कांदा निर्यातबंदीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि पाण्यासाठी होरपळणाऱ्या मतदारांसाठी गद्दार आमदारांनी सरकारला काय जाब विचारला? फक्त सत्ता हेच सर्वस्व आहे काय?" असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सिन्नर येथे कांदा निर्यातबंदी, बेरोजगारी आणि पाण्याच्या प्रश्नावर जोरदार आंदोलन करण्यात आले. अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आंदोलनासाठी नेमका हाच मतदारसंघ निवडला. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांवर केलेल्या टीकेमुळे त्यांचे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

NCP Sharad Pawar News
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या वेळी अजित पवार गटासोबत गेलेले आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. लोकसभेच्या जागावाटपासाठी तीन-तीन वेळा दिल्लीला जाणारे आणि सत्तेसाठी दिल्लीच्या फेऱ्या मारणाऱ्या या गद्दार नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी तोंड उघडले का? असा प्रश्न त्यांनी केला.

शेतकरी निर्यातबंदीमुळे अत्यंत त्रस्त आहे. त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. सध्या बेरोजगाराचे प्रमाण अकरा टक्क्यांवर पोहोचले आहे. सिन्नर तालुक्यात उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. हे अत्यंत गंभीर प्रश्न असताना गद्दार आमदार कुठे आहेत? त्यांनी काय केले?.काही केले असेल, तर सांगून दाखवावे, असे आव्हान शेख यांनी सिन्नरचे आमदार कोकाटे (Manikrao Kokate) यांचे नाव न घेता दिले.

सिन्नर (Sinnar) येथे झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि युवक सहभागी झाले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य शासनाचा निषेध केला. राज्य शासन फक्त राजकारण आणि विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांची काहीही देणे-घेणे नाही. सत्ता आणि पक्षांची तोडफोड करणाऱ्या या सत्याधार्‍यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला.

NCP Sharad Pawar News
Shinde comment on BJP Candidate : भाजप सोलापूरसाठी एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढेल; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. त्यात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुरुषोत्तम कडलग, राजाराम मुरकुटे, दिनेश धात्रक, संदीप शेळके, गणेश गायधनी, दिनेश धात्रक, बाबा निगळ, संदीप शेळके आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com