Jitendra Awhad Manikrao Kokate sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : माणिकराव कोकाटेंवर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा, न्यायालयाच्या निकालपत्रावरून म्हणाले,'मढ्याच्या टाळूवरचं लोणी...'

Jitendra Awhad Criticized Manikrao Kokate :मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही, असे न्यायालयाने कोकाटेंच्या विरोधातील निकालपत्रात म्हटले आहे.

Roshan More

Jitendra Awhad News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कोकाटे हे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारपदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकाटे यांनी राजीनामा देत नसताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंना शिक्षा ठोठावताना न्यायालयाने निकालपत्रात काय म्हटले याविषयी ट्विट केले आहे.

“आरोपी क्रमांक 1(माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला आणि कायद्याची अवहेलना केली गेली. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली गेली.”, असे कोर्टाने निकालपत्रात म्हटल्याचे आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

"मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे माफ करणं योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक‌ आहे.", असे देखील न्यायालयाने निकालपत्रात म्हटलाचे आव्हाड यांनी सांगितले आहे.

निकालपत्रा विषयी सांगताना आव्हाड म्हणाले की, हे माझे शब्द नाहीत. हे माननीय न्यायालयाचे शब्द आहेत. नाशिक दंडाधिकारी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्ष तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावताना हे शब्द वापरलेत. न्यायालयाने ते वापरले यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात यावं.

'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' म्हणजे काय असतं हे या प्रकरणात दिसून येते. सदनिका होत्या गरजू, गरीब लोकांसाठी. 1995 साली माणिकराव आणि त्यांच्या भावाने त्या हडपल्या. त्यावेळी ते किती गरीब होते? तर 1994 मध्ये त्यांनी बंदुकीच्या लायसन्ससाठी अर्ज केला. त्याचं कारणच हे होतं - 'माझ्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात आणि त्यांना रोख रक्कम दर आठवड्याला द्यावी लागते. ही रक्कम हाताळण्यासाठी सुरक्षा म्हणून बंदुकीचा परवाना मिळावा.' किती ती गरिबी आणि किती ते दैन्य! राष्ट्रातील राजकारण कोणत्या थराला गेलंय याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT