
Bihar Politics News : बिहार विधानसभा निवडणुकीआधी पाटणामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पुत्र निशांतकुमार यांच्या राजकारणात पदार्पणाबाबतच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वीच निशांतकुमार यांनी आपल्या वडिलांच्या तब्यतीबाबत केल्या जात असलेल्या टिप्पणीवरून तेजस्वी यादव यांना उत्तर दिले होते. तर आता पाटणामधील जदयूच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitishkumar) यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावाचे पोस्टर लागले आहे.
तर पक्ष कार्यालयाबाहेर लागलेल्या बॅनरवर 'बिहार करे पुकार...आइए निशांत कुमार ....' असं लिहिलेलं आहे. शिवाय यावर नितीशकुमार आणि निशांतकुमार या दोघांचेही फोटो आहेत. तर या बॅनरच्या माध्यमातून जदयू कार्यकर्त्यांनी निशांत कुमार यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. तर जदयूने(JDU) देखील ही कार्यकर्त्यांची भावना असून निशांत कुमार हे राजकारणात पदार्पणासाठी सक्षम असल्याचे म्हटलेले आहे.
दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या वक्तव्यावर राजद नेते तेजस्वी यादव(Tejashwi Yadav) यांनी म्हटले की, माझे वडील त्यांच्यापेक्षा(नितीश कुमार) जास्त स्वस्थ आहे. लालू प्रसाद यादव यांनी सामाजिक न्याय केला, केंद्रातून बिहारसाठी 1 लाख 65 हजार कोटींचे पॅकेज मिळवून दिले. लालू प्रसाद यादव यांनी बिहारसाठी जे केले, ते कुणीच केले नाही.
या आधी जेडीयूच्या प्रवक्ते म्हणाले होते की यामागे विरोधकांचे षड्यंत्र आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निशांत यांच्या राजकारणात येण्याबाबत कधीही कोणतेही विधान केलेले नाही आणि निशांत कुमार यांनी स्वतः कधीही अशी इच्छा व्यक्त केलेली नाही. सत्य हे आहे की, बिहारमधील जनता २०२५ ते २०३० पर्यंत नितीश कुमार (Nitish Kumar) यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून देणार असल्याने अनेकांना राजकीय अपचन होत आहे. मात्र याचा जेडीयू आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.