Mumbai : राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर आता दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहे. तसेच एकमेकांबाबत धक्कादायक गौप्यस्फोटही केले जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाच्या बंडानंतर 24 तासांत अजित पवारांसह आमदार भाजपसोबत जाणार होते, त्याला जयंत पाटील यांनी विरोध केला असा खळबळजनक दावा केला आहे. तसेच आमदार दिलीप बनकरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांनंतर आता बनकरांनी आव्हांडांचा दावा खोडून काढतानाच त्यांना खुलं आव्हान दिलं आहे.
निफाडचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली. बनकर म्हणाले, शरद पवार आमचे दैवत आहे. ते कालही होते आजही आहे आणि यापुढेही कायम राहतील. आव्हाडांनी दावा केल्याप्रमाणे असं कुठलंही पत्र मी जयंत पाटलांना दिलेलं नाही. जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) धादांत खोटं बोलत आहे असंही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar)हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे पितृतुल्य नेते आहेत. त्यामुळे आव्हाडांनी जो दावा केला आहे तो धादांत खोटा आहे. माझं जितेंद्र आव्हाडांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी दिलीप बनकरने शरद पवारांच्या नावाने दिलेलं एक पत्र दाखवावं, त्याची स्वाक्षरी दाखवा. शरद पवारांना सोडा असं म्हणून दिलेलं माझं स्वाक्षरी असलेलं पत्र ज्यादिवशी समोर येईल त्यादिवसापासून मी राजकारणातून निवृत्ती घेईन असंही बनकर यावेळी म्हणाले.
पवार हे राज्याचे आणि देशाचे नेते आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समूह आहे. दिलीप बनकर त्यात खूप छोटं नाव आहे. परंतू एखाद्या माणसांचं नाव घेणं आणि त्याला राजकारणात बदनाम करणं चुकीचं आहे. पण असं कोणतंही पत्र जयंत पाटलांकडे दिलेलं नाही. जितेंद्र आव्हाड खोट बोलत आहे असंही दिलीप बनकर म्हणाले. खोटेनाटे आरोप करुन कुणाचीही प्रतिमा मलीन करण्याचं काम कोणत्याही लोकप्रतिनिधीनं करु नये असा इशाराही बनकर यांनी यावेळी दिला.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते..?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीने चोवीस तासांत भाजपला पाठिंबा द्यावा अशा प्रस्तावाचे पत्र तयार केले होते. त्यावर अजित पवार यांच्यासहित अनेक आमदारांनी सह्या केल्या होत्या. मात्र, ते पत्र जयंत पाटील यांनी शरद पवारांना दिलेच नाही. पवारांना एकटे कसे सोडायचे म्हणून पाटील यांनी पत्र दिले नाही. त्यांना एकटे सोडण्यावरून जयंत पाटील रडल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
ज्या बैठकीत पत्रावर सह्या घेतल्या. त्या बैठकीत आमदार दिलीप बनकर यांनी शरद पवार यांचे वय झाले, त्यांना राहू द्या. आपण भाजपला पाठिंबा देऊयात अशी भूमिका मांडल्याचाहा खळबळजनक दावाही आव्हाड यांनी केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.