Shinde Fadnavis Government : सरकारमध्ये भुजबळांची 'एन्ट्री'; नाशिक येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम अचानक रद्द

Nashik News : राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर पहिलाच शासन आपल्या दारी कार्यक्रम नाशिकमध्ये होणार होता.
Shinde Fadnavis Government
Shinde Fadnavis GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यात सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने काही महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली. तसेच शासन आपल्या दारी हा महत्वाचा कार्यक्रम देखील हाती घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील विविध ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा नाशिक येथील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेची समीकरणं बदलली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह नऊ जणांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे. आता सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी(NCP)त मंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच नाशिकमधील शिंदे फडणवीस सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Shinde Fadnavis Government
NCP Crisis Nashik : शरद पवार आणि भुजबळ समर्थक भिडले, घोषणाबाजी!

शासन आपल्या दारीचा नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर पहिलाच शासन आपल्या दारी कार्यक्रम नाशिकमध्ये होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Shasan Aplya Dari)

शिंदे फडणवीस सरकारचा 'शासन आपल्या दारी'चा हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जळगाव येथे पार पडला होता. यानंतर पुढील कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार होता. या कार्यक्रमाची तारीखही ठरली होती, मात्र, आता अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतंच राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Shinde Fadnavis Government
Uddhav Thackeray on Political Crisis: राष्ट्रवादीतील फूटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय? ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

नाशिक जिल्ह्यात येत्या 8 जुलैला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार होता. शहरातील तपोवन परिसरातील मैदानात हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. त्यासाठीची जोरदार तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पालकमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्यासह जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी देखील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली होती. मात्र, हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे अचानक रद्द करण्यात आला आहे. आता कार्यक्रमाची पुढील तारीख अद्याप समोर आलेली नाही.

'शासन आपल्या दारी' उपक्रमात जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासन मार्गदर्शनानुसार राज्यभरात एकाचवेळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 15 तालुक्यांमध्ये एकूण 70 शिबिरे घेण्यात आली. 2 लाख 44 हजार नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com