Sanjay Shirsat | Eknath Shinde | Bharat Gogawale Sarkarnama
मुंबई

Mahayuti Cabinet Expansion : मंत्रिपदाच्या 'रेस'मध्ये मराठवाड्यातील आमदाराची एन्ट्री; शिरसाट अन् गोगावलेंचा कोट खुंटीलाच टांगून राहणार?

Shinde Shivsena News : महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

Akshay Sabale

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 'चितपट' केल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे राजकीय वर्तुंळाचं लक्ष लागलं आहे.

विस्तारात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

यातच नेहमी वादग्रस्त वक्तव्ये आणि विविध कारणांमुळे चर्चेत असलेले हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे सुद्धा मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत.

महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर संतोष बांगर मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे देखील हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी बांगर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी 'हट्ट' धरला आहे.

मंत्रिमंडळाच्या 'रेस'मध्ये बांगर यांनी एन्ट्री केल्यानं नवीन कोट शिवून बसलेले आमदार भरत गोगावले आणि आमदार संजय शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भरत गोगावले आणि शिरसाट नवीन कोट घालणार की तसाच खुंटीला टांगून राहणार हे काही दिवसांत कळणार आहे.

कुणाची नावे चर्चेत?

महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात भाजपकडून गणेश नाईक ( ऐरोली), नितेश राणे (कणकवली), माधुरी मिसाळ (पर्वती), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निंलगा), सुरेश धस (विधानपरिषद) या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

शिवसेना शिंदे गटातून संजय शिरसाट (संभाजीनगर), आशिष जैस्वाल (रामटेक), भरत गोगावे (महाड) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकतो. त्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप (नगर) आणि अण्णा बनसोडे (पिंपरी ) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.

त्याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), आदिवासी विकास मंत्री विजकुमार गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खाती बदलली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं 'प्रमोशन' होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT