Mumbai News : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे समजते. त्यासाठी राज्यातील लवकरच तीन पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीत जाणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे समजते या वृत्ताला राष्ट्र्वादी काँग्रेस अजित पवार गटातील बडे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विस्तर कधी होणार याची उत्सुकता महायुतीमधील (Mahayuti) तीन घटक पक्षांना गेल्या अनेक दिवसांपासून लागून राहिली आहे. सर्वचजण याची वाट पाहत आहेत. (Mahayuti News)
गेल्या अनेक दिवसापासून या-ना त्या कारणाने महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यासंदर्भात राष्ट्र्वादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटातील बडे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याकडे काही पत्रकारांनी विचारणा केली असता, लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळातील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पक्षांच्या वाट्याची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी विस्तार करण्यात येईल. तसेच, आता विधानसभा निवडणुकांसाठी राहिलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येईल, असेही पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या काळात दोन मंत्रिपद हवी आहेत. त्यामुळे त्यांनी दोन मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप (Bjp) व शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. त्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. यामध्ये अनेकांना मंत्री होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळा अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.