Jitendra Awhad Latest News Sarkarnama
मुंबई

Thane Kalwa Hospital News: 'जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशिलं लाल केली असती..' ; आव्हाडांनी डॉक्टरांना घेतले फैलावर

सरकारनामा ब्यूरो

Thane News: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कळवा येथे पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. "जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशिलं लाल केली असती", असे म्हणत सुमारे पाच तास मृतदेह आयसीयूमध्ये ठेवणार्‍या डॉक्टरांना आव्हाडांनी चांगलेच फैलावर घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल (गुरुवारी) दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी थेट रूग्णालय गाठून डॉक्टरांनी चांगलीच कानउघाडणी केली.

उपचाराअभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला. जिल्ह्यातील रुग्णांचे आधारवड म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जात आहे. मात्र या रुग्णालयात गुरूवारी (ता. १० ) धक्कादायक प्रकार समोर आला. दगावलेले रुग्ण हे गंभीर होते असे म्हणत रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

"गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT