Bhandara-Gondia Lok Sabha: प्रफुल पटेलांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात !

Vidarbha Politics : वडेट्टीवार यांच्यासमोर नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचा गोंदिया-भंडारा या मतदारसंघात आघाडी असल्याने आजवर काँग्रेसचा येथे पंजा जवळपास गोठलाच होता. तो आता पुनर्जिवित करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते खुश आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (अजित पवार गट) यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया-भंडारा हा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शोधत आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे बैठका घेत आहेत.

सध्या या मतदारसंघात भाजपचे सुनिल मेंढे खासदार आहेत. प्रफुल पटेल यांचा त्यापूर्वीच पराभव झाला होता. ते राज्यसभेचे खासदार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी म्हणजे पटेल असेच समीकरण होते.

Vijay Wadettiwar
Narendra Modi Lok Sabha Speech : अविश्वास प्रस्तावावरील उत्तराच्या भाषणातून मोदींनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

पटेल हे अजित पवार गटात गेले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे फारसे कार्यकर्ते येथे नाहीत. त्यामुळे या मतदासंघात काँग्रेसने लढावे, अशी सर्वांची इच्छा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपमध्ये असताना त्यांनी पटेल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात अनेक वर्षांपासून काँग्रेसचा पंजा नाही.

नागपूरमधून मागील निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते. ते यावेळी लोकसभेसाठी इच्छुक दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसला येथे नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.

Vijay Wadettiwar
Narendra Modi Lok Sabha Speech : आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केले ; सरदार वल्लभभाई पटेल यांनाही काँग्रेसने..

रामटेकमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. मात्र उमेदवार येथे महत्त्वाचा ठरतो. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र जनसंपर्काचा अभाव आणि कार्यकर्त्यांना त्यांनी जोडून ठेवले नाही. त्याचा फटका त्यांना बसला. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्यासमोर नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.

विजय वडेट्‍टीवार यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आजी, माजी आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे. विरोधीक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर वडेट्‍टीवार बुधवारी प्रथमच नागपुरात दाखल झाले. त्यांनी गुरुवारी गोंदिया-भंडारा लोकसभेचा आढावा त्यांनी घेतला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com