Kalyan Dombivali News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात अरेरावी, मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. तसेच त्यांच्या साथीदारांनीही तेथे धुडगूस घालताना मारहाण आणि अरेरावीची भाषा वापरल्याचं समोर आलं होतं.
तर कल्याण डोंबिवलीमधील रुग्णालयात शिवसेनेच्या नगरसेवकांसह साथीदारांनी सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरला धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओवरुन तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच कायदा हातात घेतलेल्यांवर कठोर कारवाईची मागणीही केली जात आहे.
यानंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. आपण महिला डॉक्टरवर हात उगारलेला नसून सीसीटीव्हीतील दृश्य कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत असावे, असा दावा केला होता. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तसेच जी मारहाण झाली याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण मी ठासून सांगतो, मी महिला डॉक्टरांवरती हात उचलला नाही, असंही रमेश म्हात्रे यांनी सांगितलं. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, आम्ही महिलांवरती हात उचलला नाही आणि यापुढेही उचलणार नाही.मात्र,त्या कुटुंबानं मला बोलावलं, त्या लोकांनी माझा फोन घेतला नाही,नंतर घटनेची गंभीरता ओळखून मी त्या ठिकाणी गेलो, असेही रमेश म्हात्रे यांनी सांगितले.
म्हात्रे म्हणाले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसते ते कॅमेरा अँगलने येत असेल, मी तिला ती बोलत होतो, कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचं लग्न झालंय की नाही हे देखील मला माहिती नाही. मात्र, आम्ही बोलत असताना ती सतत कानाला फोन लावून बोलत होती, आमची तक्रार ऐकत नव्हती, म्हणून मी हातावर फटका मारला, असेही नगरसेवक म्हात्रे यांनी स्पष्ट केली.
या घटनेवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. तसेच एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
तसेच या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे संकेतही शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.