Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : कल्याण डोंबिवलीत शिंदे गटांचा ठाकरे गटाला दणका

Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने गेली 54 वर्षे येथे हा उत्सव साजरा होत आला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिंदे गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार नाही, मात्र कल्याणमधील (Kalyan Dombivali)दु्र्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शिंदे गट (Eknath shinde) आग्रही आहे. यावरुन दोन्ही गटात वाद आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा ? यानंतर कल्याणमधील दु्र्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार ? यावरुन शिंदे ठाकरे गटात वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटाने दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली होती. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्याने कोणाला परवानगी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे.

ठाकरे गटामध्ये यामुळे नाराजीचे वातावरण असून शहरप्रमुख सचिन बासरे यांनी आम्हाला परवानगी का नाकारण्यात आली याचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट करायला हवे. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे व ठाकरे गटात चढाओढ सुरु आहे. तीच चढाओढ कल्याण डोंबिवलीत किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे व ठाकरे गटात दिसून येत होती. शिवसेनेच्या वतीने गेली 54 वर्षे येथे हा उत्सव साजरा होत आला आहे.

आता पक्षात दोन गट पडले असून खरी शिवसेना कोणाची हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन देखील शिंदे व ठाकरे गटात चढाओढ सुरु झाली. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटाचे शहर प्रमुख विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील जिल्हाधिकार्यांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता.

याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शिंदे गटातील विश्वनाथ भोईर यांना किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे .त्यामुळे किल्ले दुर्गाडीवर यंदाचा म्हणजेच 55 वा नवरात्र उत्सव शिंदे गटातील शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार असल्याचे निश्चित झाले आहे .

आम्ही कायदेशीर लढाई लढू

याबाबत ठाकरे गटातील कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. गेली 54 वर्षे या ठिकाणी शिवसेनाच नवरात्र उत्सव साजरा करते. यंदा मात्र आम्हाला का परवानगी नाकारण्यात आली याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेला नाही. या निर्णयाबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढू असा इशारा बासरे यांनी दिलाय .तर शिंदे गटातील कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असून आता दिवस कमी उरलेत लवकरात लवकर तयारी पूर्ण करत यंदा नवरात्रीचा उत्सव जल्लोषात करणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT