राऊतांप्रमाणे उद्या तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल ; मनसेनं शिवसेनेला डिवचलं

Shiv Sena : बीकेसीतील एका मैदानावर एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे,
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हे प्रकऱण आता उच्च न्यायालयात गेलं आहे.आज (गुरुवार) त्यावर सुनावणी होणार आहे. काल (बुधवारी) शिवसेनेच्या (Shiv Sena)गटनेत्यांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात लीलाधर डाकेंसह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. अनेक नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळाली आहे. तर, संजय राऊत यांच्यासाठीही व्यासपीठावर खूर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा," असे टि्वट देशपांडे यांनी केले.

Sandeep Deshpande
Dussehra Melava : गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना टार्गेट ; रेल्वे, बस बुकिंगसाठी चढाओढ

बीकेसीतील एका मैदानावर एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे, मात्र, दुसऱ्या मैदानावर उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा याकरता पालिकेने परवानगी द्यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोघेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. दोन्ही गटाला परवानगी मिळत नसल्यने शिंदे गटाने आपला दसरा मेळावा, बीकेसीच्या मैदानावर घेण्याची तयारी सुरु केली आहे, बीकेसीने त्यांना परवानगी दिली आहे. शिवसेनेचा अर्ज बीकेसीने फेटाळला आहे.

सध्या खरी शिवसेना कोणती? शिंदे गट की, उद्धव ठाकरेंची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अशातच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी रितसर महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, यावर मनपाकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, यामुळे आता शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र परवानगी मिळत नसल्याने शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर मेळाव्याच्या तयारीस सुरवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com