The assaulted receptionist from Kalyan is under treatment at Janaki Hospital. Doctors warn of possible paralysis due to serious injuries caused by Gokul Jha Sarkarnama
मुंबई

Kalyan Hospital Girl Assault: "छाती अन् पोटावरील मारहाणीमुळे..." गोकुळ झाने मारहाण केलेल्या तरूणीबाबत डॉक्टरांनी व्यक्त केली मोठी भीती

Kalyan Hospital Receptionist Case : कल्याणमधील नांदिवली परिसरात गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय तरुणानं एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Jagdish Patil

Kalyan News, 23 Jul : कल्याणमधील नांदिवली परिसरात गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय तरुणानं एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता मारहाण झालेल्या तरुणीबाबात डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली आहे. मारहाणीमुळे या तरूणीला पॅरालिसीस होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

या घटनेत मारहाण झालेल्या तरूणीवर सध्या जानकी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णालयाचे डॉ. मोईन शेख यांनी सांगितलं की, तरुणीच्या मानेवर, पायावर आणि छातीवर गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या तरूणीवर तात्काळ उपचार केले असले तरी तिला मान हलवताना खूप त्रास होतोय. या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तरूणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा यांना अंबरनाथच्या नेवाळी परिसरातून मनसे कार्यकर्त्यांनी पकडून डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं.

आरोपीला नेवाळी परिसरांमधून ताब्यात घेतल्यानंतर त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवल्याची माहिती योगेश यांनी दिली. आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोकुळ झा हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT