Marathi Hindi Controversy : "मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर लगेच..."; हिंदी-मराठी वादात राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची उडी

Governor Radhakrishnan Statement : "भाषेच्या नावावर अशी दहशत पसरवली तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवाल करत, अशा दहशतीमुळे आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला नुकसान करत आहोत. आपण अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत."
Governor Radhakrishnan
Governor RadhakrishnanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Jul : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. नुकतंच मुंबईत काही हिंदी भाषिकांना मारहाण देखील करण्यात आली होती. मराठी बोलता येत नाही म्हणून ही मारहाण केल्याचा आरोप अमराठी लोकांकडून करण्यात आला होता.

अशातच आता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मराठी हिंदी वादावर भाष्य केलं आहे. मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर मला लगेच मराठी बोलता येईल का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशा प्रकारे भाषेच्या नावावर दहशत पसरवणं राज्यासाठी हितकारी नसल्याचं म्हटलं आहे.

या दहशतीमुळे महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठी आणि हिंदी वादावर भाष्य केलं.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तमिळ भाषा येत नाही म्हणून काही लोकांना मारहाण केल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात मराठी बोलतं नाही तर मार खावा लागेल, हे मी पेपरमध्ये वाचत आहे. असाच वाद तामिळनाडूमध्ये झाला होता तेव्हा मी खासदार होतो. हायवेने जाताना रस्त्याच्या कडेला काही लोकांना मारहाण केली जात होती.

Governor Radhakrishnan
Viral Video : डॉक्टरांनी पेशंटआधी 'एमआर'ला केबिनमध्ये बोलावलं! संतापलेल्या तरुणाची रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण

ते पाहून मी माझ्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. मात्र, मला बघून मारहाण करणारे पळून गेले. मात्र ज्यांना मारलं होतं ते लोक तिथेच होते. यावेळी नेमकं काय झालं याची विचारना केली असता ते मला सर्व घटना हिंदीत सांगू लागले. पण मला हिंदी येत नसल्याने ते काय सांगत आहेत ते कळेना.

तेव्हा एका तमिळ व्यक्तीने सांगितलं की, त्यांना तामीळ येत नाही म्हणून लोकांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे जबरदस्ती तामीळ बोलण्याचा आग्रह केला जात होता आणि त्यांना बोलताना येईना म्हणून मारहाण केली गेली. त्याप्रमाणे आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच मराठी बोलता येईल का?

दरम्यान, ज्या लोकांना मारहाण झाली होती त्यांची मी माफी मागितली, जेवायला पैसे दिले आणि त्यांना गाडीत बसवून मी निघून गेलो', असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. शिवाय जर भाषेच्या नावावर अशी दहशत पसरवली तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का?

Governor Radhakrishnan
Karuna Munde: महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या 'हनी ट्रॅप' प्रकरणात धक्कादायक वळण; करुणा मुंडेंनी 'त्या' महिलेलाच समोर आणलं

असा सवाल करत, अशा दहशतीमुळे आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला नुकसान करत आहोत, असं ते यावेळी म्हणाले. तसंच, आपण अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत आणि आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे, त्याबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com