Vaishali Darekar, Srikant Shinde Sarkarnama
मुंबई

Kalyan Constituency: पाहुण्यांना घरी पाठवण्याची वेळ आलेय, वैशाली दरेकरांचा श्रीकांत शिंदेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

Vaishali Darekar On Srikant Shinde: पाहुण्यांचा पाहुणचार खूप केला, आता पाहुण्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी नाव न घेता श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून दरेकर यांना तर महायुतीकडून या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कल्याण (Kalyan) डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका असलेल्या वैशाली दरेकर-राणे (Vaishali Darekar) यांना कल्याणमधून उमेदवारी देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळली आहे. दरेकर विरुद्ध शिंदे अशी लढत या मतदारसंघात होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून इथे जोरदार प्रचार केला जात असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील केले जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी नाव न घेता केलं श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाहुण्यांचा पाहुणचार खूप केला आता पाहुण्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.कल्याण पूर्वेत आयोजित महाविकास आघाडीच्या (MVA) मेळाव्याला दरेकर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी यांची 10 तारखेला कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी सभा होती, मात्र त्या सभेने काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंचीदेखील कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सभा होणार आहे. शिवाय महाविकास आघाडी प्रचारात पुढे असून विजय होईल आमचाच होईल असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

हॅटट्रिक चुकू शकते

महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने ते विजयाची ते हॅटट्रिक करु शकतात अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर काही दिवसांपूर्वी दरेकर यांनी भाष्य केलं होतं. चर्चा सुरु आहेत पण यंदा 'हॅटट्रिक चुकू शकते' असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT