Baramati Lok Sabha News : 'माहेरवाशीण'चा पाहुणचार करा अन् सासरी पाठवा; अजितदादांचा बहिणीला टोला!

Lok Sabha Election 2024 : "तुम्ही सून म्हणून आला की घरची होते, आमच्यात मात्र चाळीस वर्षे झाले तरी ती बाहेरची सून असते.."
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Baramati News : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी टीका-टिप्पण्णी आणि आरोप प्रत्यारोपांना धार चढत आहे. बारामतीतील सुप्रिया पवार विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीत आता प्रचार सभांना उधाण आले आहे. बारामती येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'माहेरवाशीण आपल्या घरी आल्यानंतर साडीचोळी करा आणि योग्य तो पाहुणचार करून पुन्हा मुलीला सासरी पाठवा, अशी आपली रीत आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. (Latest Marathi News)

बारामती येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर नाव न घेताच अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. अजित पवार म्हणाले, "तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. दडपशाहीला घाबरुन जाऊ नका. सात तारखेनंतर तुम्ही आणि मीच आहे. बाकीचे सगळे परदेशात फिरायला जातील. चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकांना साथ देणार आहोत, अशा शब्दात अजित पवारांनी मतदारांना साद घातली.

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?
Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

महिलांसाठी केंद्र सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. एकिकडे आपण महिला सक्षमीकरणावर भर देत आहोत. मात्र तुम्ही सून म्हणून आली की घरची होते, आमच्यात मात्र चाळीस वर्षे झाले तरी ती बाहेरची सून असते, अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. 'माहेरवाशीण आपल्या घरी आल्यानंतर साडीचोळी करा आणि योग्य तो पाहुणचार करून पुन्हा मुलीला सासरी पाठवा, अशी आपली रीत आहे,' असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com