Raju Patil Vs Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Raju Patil Vs Shrikant Shinde: निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे; पाटलांचा शिंदेंना खोचक सल्ला

Kalyan Lok Sabha Constituency 2024:लाखो मताधिक्याने कोणी निवडणूक जिंकणार, असे चित्र नाही. महायुतीत धुसफूस सुरू आहे. त्यातही राष्ट्रवादी आली आहे.

Mangesh Mahale

शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी या नेत्यांना समजून सांगा, अन्यथा कल्याण मतदारसंघाचा (Kalyan Lok Sabha Constituency) निकाल वेगळा लागू शकतो, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil)यांनी निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे, असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांना दिला आहे.

कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे. या ठिकाणी अँटिइन्कंबन्सी आहे. लाखो मताधिक्याने कोणी निवडणूक जिंकणार, असे चित्र नाही. महायुतीत धुसफूस सुरू आहे. त्यातही राष्ट्रवादी आली आहे. ज्यांना निवडून यायचे आहे. त्यांनी सावरून घ्यावे," असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव ने घेता दिला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजू पाटील यांनी हे विधान केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या वाचाळवीर शिवराळ शिवतारेला समजवावे. आमच्या शक्तिस्थळावर शिवसेनेचे वाचाळवीर नेते आघात करत असतील, तर स्वाभिमानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याला चोख प्रत्युत्तर देईल. आणि आगामी निवडणुकीत कल्याण लोकसभेत वेगळं चित्र दिसेल, असा इशारा परांजपे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील महायुतीचे चांगले वातावरण राहावं असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारेला समजवावे. आमच्या शक्तिस्थळावर कोणी घाला घालत असेल, तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे परांजपे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता.

काल नाशिक येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा झाला. हा मेळावा लोकसभेच्या निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिला जात होता. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठविण्याची घोषणा केली.

गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटात फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपला पाठिंबा दिला होता. हा निर्णय आपण उमेदवारीच्या कमिटमेंटमुळे घेतला होता, असा त्यांचा दावा होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT